दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्यावर कारवाई सुरू असतानाच आता त्यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून केजरीवाल यांची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. आम आदमी पक्षाला बंदी असलेल्या खलिस्तानवादी संघटनेकडून निधी मिळाला, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. “सिख फॉर जस्टीस” या संघटनेवर बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र या संघटनेकडून जवळपास १६ दशलक्ष डॉलर्सचा निधी पक्षाला मिळाला, अशी तक्रार नायब राज्यपालांना मिळाली आहे.

नायब राज्यपालांच्या सचिवालयाने दिलेल्या माहितीनुसार, १९९३ च्या दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपी आणि दहशतवादी देवेंद्र पाल भुल्लरची सुटका करणे आणि खलिस्तानी भावनेचे समर्थन करण्यासाठी हा निधी दिला गेला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. वर्ल्ड हिंदू फेडरेशनच्या आशू मोंगिया यांनी सदर तक्रार नायब राज्यपालांकडे केली.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
Image Of Atul Save
Atul Save : कॅबिनेट मंत्री अतुल सावेंविरोधात शिवसेना मैदानात, पालकमंत्रीपदास केला विरोध
devendra fadnavis chhagan bhujbal ajit pawar
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं नाव घेत म्हणाले, “छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं नाही त्यामागे…”

नायब राज्यपाल सक्सेना यांनी केंद्रीय गृह सचिवांना केलेल्या शिफारशीत म्हटले की, बंदी असलेल्या कट्टरपंथी संघटनेकडून निधी मिळाल्याची तक्रार एका विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या विरोधात प्राप्त झाली आहे. त्यामुळे तक्रारदाराने जे इलेक्ट्रॉनिक पुरावे सादर केले आहेत. त्याचे फॉरेन्सिक तपासणी करण्याची आवश्यकता आहे.

सक्सेना यांनी गृह मंत्रालयाला असेही म्हटले की, केजरीवाल यांनी जानेवारी २०१४ मध्ये इक्बाल सिंग यांना पत्र लिहिले होते. ज्यामध्ये प्रा. भुल्लर यांची सुटका करण्यासाठी आप सरकारने राष्ट्रपतींना विनंती केल्याचा मुद्दा नमूद केला आहे. तसेच एसआयटी स्थापन करून इतर मुद्द्यांबाबत सहानुभूतीपूर्वक आणि कालबद्ध पद्धतीने काम करेल, असेही आश्वासन या पत्राच्या माध्यमातून देण्यात आले होते.

कोण आहे देवेंद्र पाल भुल्लर?

१९९३ साली दिल्लीतील युवक काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर झालेल्या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू तर ३१ जण जखमी झाले होते. या प्रकरणी भुल्लरला दोषी ठरविण्यात आले होते. जर्मनीतून हद्दपार केल्यानंतर भुल्लरला अटक करण्यात आली होती.

१९९५ पासून भुल्लर तिहार तुरुंगात आहे. ऑगस्ट २००१ साली दहशतवाद आणि फूटीरतावादी कृत्य (प्रतिबंध) कायद्याच्या कलमाखाली भुल्लरला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र २०१४ साली त्याच्या फाशीच्या शिक्षेला जन्मठेपेत बदलण्यात आले.

‘आप’कडून नायब राज्यपालांचा निषेध

राज्यपालांनी केजरीवाल यांच्या एनआयए चौकशीची मागणी केल्यानंतर आम आदमी पक्षानेही त्याला प्रत्युत्तर दिले आहे. नायब राज्यपाल हे भाजपाचे एजंट असल्याप्रमाणे वागत आहेत. दिल्लीतील सातही मतदारसंघात पराभव दिसत असताना भाजपाने अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात आणखी षडयंत्र रचले आहे, असा आरोप ‘आप’ने केला. तर दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले की, भाजपाने पंजाब विधानसभा निवडणुकीआधीदेखील हाच आरोप केला होता.

Story img Loader