आम आदमी पक्षाकडून भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आल्यानंतर दिल्लीचे नायब राज्यपाल वी. के. सक्सेना यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर पलटवार केला आहे. मुख्यमंत्री केजरीवाल हे भिन्न डावपेच खेळत असून खोटे आरोप करत आहेत, असे सक्सेना यांनी म्हटले आहे. केजरीवालांकडून आणखी काही वैयक्तिक आणि निरर्थक आरोप झाल्यास आश्चर्य वाटणार नाही, असेही सक्सेना म्हणाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“सिसोदियांना अटक केली तर गुजरातमध्ये…”; अरविंद केजरीवालांचं मोठं वक्तव्य

“मी दिल्लीत सुशासन, भ्रष्टाचार शून्य कारभार आणि जनतेला चांगल्या सोयीसुविधांसाठी आग्रही होतो. मात्र, दुर्देवानं माननीय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हतबल होऊन खोटे आरोप करत आहेत”, अशा आशयाचं ट्वीट सक्सेना यांनी केलं आहे. कोणत्याही परिस्थिती घटनात्मक कर्तव्यापासून परावृत्त होणार नाही. दिल्लीच्या जनतेसोबत असलेली माझी बांधिलकी कायम राहिल, असेही सक्सेना यांनी पुढे ट्वीटमध्ये म्हटले आहे. दिल्लीतील शाळांमधील वर्गखोल्यांचे बांधकाम रखडल्याच्या सीवीसी अहवालावर केजरीवाल सरकारने जवळपास अडीच वर्ष कारवाई केली नाही, असा आरोप देखील सक्सेना यांनी केला आहे.

दिल्लीत केजरीवालच! ५८ मतांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव

दरम्यान, ‘आप’चे आमदार दुर्गेश पाठक यांनी दिल्ली विधानसभेत बोलताना वी. के. सक्सेना यांच्यावर १४०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. सक्सेना यांनी २०१६ मध्ये खादी व ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष असताना आपल्या आयोगातील कर्मचाऱ्यांवर १४०० कोटींच्या नोटा बदलून आणण्यासाठी दबाव आणला होता,  असा आरोप पाठक यांनी सोमवारी विधानसभेत केला होता. हे आरोप सक्सेना यांनी फेटाळून लावले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi l g v k saxena hits back at aap corruption allegations rvs