नवी दिल्ली : लेखिका अरुंधती रॉय आणि काश्मीरमधील माजी प्राध्यापक यांच्यावर २०१० मध्ये एका कार्यक्रमात कथितपणे प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल कठोर बेकायदा कृती (प्रतिबंध) कायद्यांतर्गत खटला चालवण्यास दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी मंजुरी दिली आहे. राज निवासच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> कोची विमानतळावर हृदयद्रावक स्थिती; ३१ भारतीयांचे मृतदेह पोहोचताच प्रियजनांचा शोक

रॉय आणि काश्मीर सेंट्रल युनिव्हर्सिटीचे माजी प्राध्यापक शेख शौकत हुसेन यांच्याविरुद्ध नवी दिल्लीच्या महानगर न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करण्यात आला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. रॉय आणि हुसेन यांच्याकडून लगेच कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. काश्मीरमधील सामाजिक कार्यकर्ते सुशील पंडित यांच्या तक्रारीवरून २८ ऑक्टोबर २०१० रोजी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती.

राज निवासच्या अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले की, ‘‘दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी अरुंधती रॉय आणि काश्मीरमधील सेंट्रल विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय कायद्याचे माजी प्राध्यापक डॉ. शेख शौकत हुसेन यांच्याविरुद्ध बेकायदा कृती (प्रतिबंध) कायद्याच्या कलम ४५ (१) अन्वये खटला चालवण्यास मान्यता देण्यात आली आहे. रॉय आणि हुसेन यांनी २१ ऑक्टोबर २०१० रोजी येथील कोपर्निकस मार्गावरील एलटीजी सभागृहात ‘आझादी – एकमेव मार्ग’ या बॅनरखाली आयोजित परिषदेत प्रक्षोभक भाषणे केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi lt governor saxena grants prosecution of author arundhati roy under uapa zws