दिल्लीत श्वानावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका ३६ वर्षीय इसमाला अटक करण्यात आली आहे. दिल्लीतल्या शाहदारा भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर ही घटना प्रकाशात आली. नौशाद नावाचा हा माणूस आहे ज्याने कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.
७ एप्रिलला कुत्र्यावर लैंगिक अत्याचार
कुत्र्यावर लैंगिक अत्याचार करणारा नौशाद हा मूळचा बिहारचा आहे. ७ एप्रिलच्या दिवशी त्याने कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर १० एप्रिलला नौशादच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी नौशादला शोधून त्याला अटक केली. नौशादच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११ आणि कलम ३२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा व्हिडीओ व्हायरल
नराधमाने कुत्र्यावर अनैसर्गिक अत्याचाराचा केल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आला आहे, असे दिल्ली पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे. व्हिडिओमध्ये त्या माणसाला लोक मारहाण करताना आणि त्याने किती कुत्र्यांवर अत्याचार केला आहे, असे विचारताना दिसत आहे. हा व्हिडिओ एका प्राणी प्रेमीने सोशल मिडिया एक्सवरती शेअर केला आहे. अनैसर्गिक अत्याचाराचा आरोप असलेल्या त्या व्यक्तीला अनेक लोक त्याला मारहाण करत आहेत. व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला विचारताना ऐकू येते की, तू किती कुत्र्यांवर अत्याचार केला आहे? प्राणी प्रेमीने दिल्ली पोलिस, मुख्यमंत्री रेखा गुप्ता, एलजी कार्यालय आणि इतर अनेक नेत्यांनाही हा व्हिडिओ टॅग केला होता.
काही दिवसांपूर्वी पुण्यातही अशीच घटना
काही दिवसांपूर्वी पुण्यातही अशीच घटना घडली होती. एका विकृत माणसाने श्वानावर अत्याचार केला. या प्रकरणी पुण्यातल्या काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हलीमुद्दीन शेख नावाच्या २० वर्षांच्या तरुणाने एका कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केले होते. कुत्र्याचा मालक बाहेरगावी गेले असताना त्याने हे कृत्य केलं होतं. आता अशीच घटना दिल्लीत घडली आहे.