भारतात काहीही होऊ शकते, याचा आणखी एक नमुना गुरुवारी दिल्ली मेट्रोमध्ये दिसला. मेट्रोचे दरवाजे बंद न करताच ती एका स्थानकातून दुसऱया स्थानकात नेल्याची गंभीर घटना गुरुवारी सकाळी घडली.
साधारणपणे एक मिनिट २५ सेकंद या मेट्रोचे सर्वच्या सर्व दरवाजे उघडेच होते. या घटनेची गंभीर दखल घेत दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने संबंधित गाडीच्या मोटारमनला तातडीने निलंबित केले आहे. दिल्ली मेट्रोच्या जहांगीरपुरी ते हुडा सिटी सेंटर या यलो लाईनवर ही घटना घडली. मेट्रोचे दरवाजे उघडे राहिले त्यावेळी ती अर्जानगढहून घितोर्नी स्थानकाकडे निघाली होती. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मोटारमनच्या अक्षम्य चुकीमुळेच हा प्रकार घडल्याचे दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने काढलेल्या निवेदनात म्हटले आहे.
दिल्ली मेट्रो धावली दरवाजे उघडेच ठेवून; मोटारमन निलंबित
भारतात काहीही होऊ शकते, याचा आणखी एक नमुना गुरुवारी दिल्ली मेट्रोमध्ये दिसला.
First published on: 17-07-2014 at 03:17 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi metro runs with door open dmrc suspends train driver