मनी लाँडरिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांना ९ जूनपर्यंत ईडी (अंमलबजावणी संचालनालय) ची कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने हा आदेश दिला आहे. तर ईडीने न्यायालयाकडे सत्येंद्र जैन यांची १४ दिवसांची कोठडी मागितली होती.

ईडीकडून १४ दिवसांच्या कोठीडीची मागणी
ईडीच्यावतीने तुषार मेहता यांनी न्यायालयात बाजू मांडली. फेब्रुवारी २०१५ ते मे २०१७ या कालावधीत पैसे इकडे-तिकडे नेण्यात आले. हवालामध्ये पैसे कसे गुंतवले गेले आणि दिल्लीहून कलकत्त्याला पैसे कसे पाठवले गेले याची डेटा एन्ट्री आमच्याकडे असल्याचे ईडीने सांगितले. तसेच शेल कंपन्या कलकत्ता बेस आहेत. ते १४ दिवसांची कोठडी का मागत आहेत, अशी विचारणा न्यायालयाने ईडीला केली. त्यावेळी ईडीने सांगितले की, जे धनादेश अद्याप कॅश झाले नाहीत त्यांची माहिती काढावी लागेल. ८ कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्यात आले आहेत. त्या ८ कंपन्या जैन यांच्याशी संबंधित आहेत. तसेच, ज्या ८ कंपन्यांकडून पैसे हस्तांतरित करण्यात आले, त्यांचा स्रोतही कळू शकलेला नाही.

पुराव्याशी छेडछाड करू शकतात
या प्रकरणी सत्येंद्र जैन यांना अंतरिम जामीनही देऊ नये, अशी मागणी ईडीने सुनावणीदरम्यान न्यायालयाला केली आहे. सत्येंद्र जैन यांना जामीन मिळाल्यास या प्रकरणी जे पुरावे मिळाले आहेत त्यासोबत सत्येंद्र जैन छेडछाड करू शकतात असा संशय ईडीने व्यक्त केला आहे.

Story img Loader