श्रद्धा वालकरने हत्येच्या आधी केलेलं संभाषण समोर आलं आहे. १८ मे रोजी म्हणजेच मृत्यूच्या काही तास आधी श्रद्धाने हा संवाद साधला होता. श्रद्धाने दुपारी ४ वाजून ३४ मिनिटांनी आपल्या एका मित्राला मेसेज पाठवला होता. पण हा आपला शेवटचा मेसेज असेल याची श्रद्धाला कल्पनाही नव्हती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रद्धाने मित्राला पाठवलेल्या मेसेजमध्ये ‘I Have Got News’ असं लिहिलं होतं. यानंतर श्रद्धाने आणखी एक मेसेज पाठवला होता. यामध्ये तिने आपण एका कामात व्यग्र असल्याचा उल्लेख केला होता.

Shraddha Walkar Murder: श्रद्धाच्या शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये नेमकं काय होतं? ‘Happy Days’ असं का म्हटलं होतं?

PHOTOS: मुंडकं कापून फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आफताब रोज श्रद्धाचा चेहरा पाहायचा, धक्कादायक खुलासे ऐकून पोलीसही चक्रावले

त्याच संध्याकाळी ६ वाजून २९ मिनिटांनी मित्राने श्रद्धाला काय बातमी आहे? अशी विचारणा केली होती. पण श्रद्धाने कोणतंही उत्तर दिलं नव्हतं. यानंतर त्या मित्राने तिला विचराण्याचा प्रयत्न केला. पण श्रद्धाने उत्तर दिलं नाही.

आफताबनेही दिलं नाही मेसेजला उत्तर

१५ सप्टेंबर ४ वाजून ३५ मिनिटांनी मित्राने आफताबला मेसेज पाठवून काय झालं? तू कुठे आहेस? तुझ्याशी बोलायचं आहे असं सांगितलं होतं. यावेळी त्याने श्रद्धा कुठे आहे? अशीही विचारणा केली होती. पण आफताबने त्याला उत्तर दिलं नव्हतं. यानंतर मित्राने ५ वाजता आफताबला फोनही केली होता. पण आफताबने त्याचंही उत्तर दिलं नाही.

२४ सप्टेंबरला मित्राने श्रद्धाला मेसेज करुन तू सुरक्षित आहेस का? अशी विचारणा केली. यानंतर मित्राला श्रद्धाला काहीतरी झालं असावं अशी शंका आली. मित्राने सांगितल्यानुसार, श्रद्धाच्या चॅटमध्ये २४ सप्टेंबरला करण्यात आलेले मेसेज वाचलेला दिसत आहे, पण कोणीही उत्तर दिलं नव्हतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi murder case shraddha walkar last message to friend saying i have got news sgy