दिल्लीत २० वर्षांच्या साहिल नावाच्या मुलाने १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची हत्या केली. त्याने तिच्यावर चाकूचे वार केले आणि त्यानंतर दगडाने ठेचून तिला ठार केलं. तीन बहिणींचा भाऊ असलेला साहिल हा एसी मॅकेनिकचं काम करत होता. साहिलने अत्यंत निर्घृणपणे अल्पवयीन मुलीची हत्या केली. अत्यंत सणकी स्वभावाच्या साहिलने त्याच्या मैत्रिणीची म्हणजेच त्या १६ वर्षांच्या मुलीची हत्या केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिघडलेलं वर्तन आणि सणकी स्वभावाचा साहिल

साहिल त्याच्या मित्रांसह कायमच दारुची पार्टी करत असे. त्याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत तो हुक्का पितानाही दिसतो आहे. त्याची प्रत्येक हालचाल, त्याचे हावभाव यावरुनच लक्षात येतं की तो बिघडलेला आहे आणि सणकी स्वभावाचा आहे.

रविवारी काय घडलं?

रात्री ८ वाजता- १६ वर्षांच्या मुलीने तिच्या मित्राच्या घरी जायला निघाली होती. त्यावेळी वाटेत तिला मोहम्मद साहिल खान भेटला आणि तो तिच्याशी अरेरावीने बोलू लागला.

रात्री ८.४५ : E ब्लॉक या ठिकाणी पोहचल्यानंतर साहिलने या अल्पवयीन मुलीवर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या केली. त्यानंतर साहिल तिथून पळून गेला. त्याने त्याचा मोबाईल बंद केला.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसतं आहे?

साहिल अल्पवयीन मुलीवर सातत्याने वार करु लागला. एका माणसाने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला पण साहिल थांबला नाही. तो माणूस तिथून निघून गेला. अनेक लोक हे घडताना बघत होते पण कुणीही साहिलला अडवलं नाही किंवा त्या मुलीचा जीव वाचवला नाही. चाकूचे वार केल्यानंतर एक सिमेंटचा ब्लॉक त्याने उचलला आणि तिच्या डोक्यात वार केले. दगडाने तिचं डोकं ठेचलं. त्यानंतर तो तिथून पळून गेला.

साहिलला पोलिसांनी कशी अटक केली?

साहिलने अल्पवयीन मुलीला ठार केलं आणि त्यानंतर तो बुलंदशहर या ठिकाणी गेला. तिथे त्याने आत्याच्या फोनवरुन त्याने वडिलांना फोन केला. पोलिसांनी हा फोन ट्रॅक केला. पोलिसांनी विविध पथकं तयार केली. त्यानंतर १६ तास त्याचा शोध सुरु होता. त्यानंतर पोलिसांनी हा खून साहिलने का केला असेल? यामागचं कारणही शोधत होते. त्यानंतर पोलिसांनी हत्या झालेल्या मुलीची ओळख पटवली. साहिलला लोकेशनवरुन पोलिसांनी घटना घडल्यानंतर १६ तासांनी अटक केली.

साहिलने चौकशीत काय सांगितलं?

त्याच्या मैत्रिणीने म्हणजेच हत्या झालेल्या अल्पवयीन मुलीने दुसऱ्या मुलासह मैत्री केली हे साहिलला आवडलं नव्हतं. त्याने या मुलीच्या हातावर नव्या मित्राच्या नावाचा टॅटूही पाहिला त्यामुळे त्याच्या रागाचा पारा चढला आणि त्याने तिची हत्या केली.

साहिलने नुकताच चाकू खरेदी केला होता

साहिलने नुकताच एक लांबलचक चाकू खरेदी केला होता ही माहितीही त्याने चौकशीत पोलिसांना दिली. त्याने हाच चाकू अल्पवयीन मुलीची हत्या करण्यासाठी वापरला. पोलीस हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेला हा चाकू शोधत आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने याविषयीचं वृत्त दिलं आहे.

साहिलचा फोन पोलिसांनी केला जप्त

साहिलचा फोन पोलिसांनी जप्त केला आहे. या फोनमधून पोलिसांना अनेक पुरावे सापडले आहेत. २४ महिन्यांपासून या दोघांची मैत्री होती हेदेखील समजलं आहे. साहिल हा दिल्लीतल्या जैन कॉलनीत त्याचे आई-वडील आणि तीन बहिणींसह राहात होता. आता पोलीस या साहिल ज्यांच्या घरात राहत होता त्या मालकाचीही चौकशी पोलीस करणार आहेत. जून २०२१ पासून अल्पवयीन मुलगी आणि साहिल हे दोघं एकमेकांना ओळखत होते. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जे काही केलं आहे त्याचा थोडासाही पश्चात्ताप साहिलला नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi murder sahil stabs 16 year girl and killed her read inside story of this incident scj