Rekha Gupta Oath Ceremony Highlights: दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची मोठी चर्चा होती. अखेर बुधवारी भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यामुळे चौथ्यांदा दिल्लीत महिलाराज अवतरणार असल्याचं स्पष्ट झालं. दिल्लीच्या रामलीला मैदानावर रेखा गुप्ता यांच्यासह भाजपाच्या आणखी सहा आमदारांचा शपथविधी पार पडला. रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रीपदाची तर इतर सहा आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शिवाय मोठ्या संख्याबळासह रेखा गुप्ता मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यामुळे आता दिल्लीचा कारभार कशा पद्धतीने चालणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Delhi New Chief Minister Oath Ceremony LIVE Updates, 20 February 2025: दिल्लीत चौथ्यांदा ‘महिलाराज’, रेखा गुप्ता मुख्यमंत्रीपदी!
Delhi New Chief Minister Rekha Gupta Swearing-in Ceremony: लेकाला आईचा अभिमान! रेखा गुप्ता यांच्या मुलाची प्रतिक्रिया…
आम्हाला आईचा खूप अभिमान वाटतोय. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही त्यांना काम करताना पाहिलं आहे. त्यांच्यावरचा सगळा ताण पाहिला आहे. आम्हाला ते पाहून कळतं की राजकारण किती अवघड गोष्ट आहे. त्यांनी स्वत:च्या हिंमतीवर हे यश मिळवलं आहे. आम्हाला त्यांचा फार अभिमान वाटतो. मला माझ्या आईवर, पक्षावर पूर्ण विश्वास आहे – निकुंज गुप्ता
रेखा घरही सांभाळत होती, समाजही सांभाळत होती. तिनं दोन वर्षं संपूर्ण शालिमार सांभाळलं. तिची काम करण्याची सवय आहे. मला खूप आनंद झाला. मला इतका आनंद झालाय, लोकांनी मला इतक्या शुभेच्छा दिल्यात की माझी झोळी आता कमी पडतेय – मीरा गुप्ता
Delhi chief minister oath ceremony: केजरीवालांना पराभूत करणाऱ्या परवेश वर्मांची शपथ
आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात पराभव करणाऱ्या परवेश वर्मा यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
Delhi New CM Rekha Gupta Oath Ceremony Live Update: रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी, घेतली शपथ
रेखा गुप्ता यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, त्यांच्यासह सहा आमदारांनीही घेतली मंत्रीपदाची शपथ
Delhi Cabinet Ministers Swearing Ceremony LIVE Updates: रेखा गुप्ता यांच्यासह एकूण सहा आमदारांना मंत्रीपदाची शपथ
१. परवेश वर्मा (नवी दिल्ली)
२. मनजिंदर सिंग सिरसा (राजौरी गार्डन)
३. रविंद्र कुमार इंद्रज (बवाना)
४. कपिल मिश्रा (करवाल नगर)
५. आशिष सूद (जनकपुरी) आणि
६. पंकज कुमार सिंग (विकासपुरी)
Rekha Gupta Swearing-in Ceremony Live Update: शपथविधी सोहळ्याला सुरुवात
दिल्लीच्या रामलीला मैदानावर रेखा गुप्ता यांच्या शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली असून त्यांच्यासह काही आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
Delhi New CM Oath Ceremony Live: रेखा गुप्तांच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल
रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेणार असून त्यांच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रामलीला मैदानावर दाखल झाले आहेत.
Delhi New Chief Minister Oath Ceremony LIVE Updates: काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी दिल्या रेखा गुप्तांना शुभेच्छा!
रेखा गुप्तांचं नाव जाहीर झालं तेव्हा मला ३० वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला. १९९५ सालचा एक फोटो मला सापडला. त्यात मी एनएसयूआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकले होते तर रेखा गुप्तांनी अभाविपच्या सचिवपदाची निवडणूक जिंकली होती. आम्ही तेव्हा २० वर्षांच्या होतो. आम्ही एकत्र मिळून काम केलं. त्यांच्याशी विचारसरणीचा वाद होता, यापुढेही राहील. महत्त्वाच्या मुद्द्यांवर रेखा व माझी सहमती असायची, आम्ही एकत्र मिळून काम केलं आहे. रेखा त्या काळातही फार आक्रमक होती – अलका लांबा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रेखा गुप्ता यांच्या शपथविधीसाठी दिल्लीच्या रामलीला मैदानावर दाखल
Delhi New Chief Minister Oath Ceremony LIVE Updates: रेखा गुप्ता शपथविधीआधी हनुमान मंदिरात दर्शनाला
रेखा गुप्ता यांनी शपथविधीआधी घेतलं दिल्लीतील मरघट वाले हनुमान मंदिरात दर्शन
Delhi New Chief Minister Oath Ceremony LIVE Updates: विधानसभा अध्यक्षपदी विजेंदर गुप्ता
दिल्ली विधानसभा अध्यक्षपदी रोहिणी मतदारसंघातून निवडून आलेले भाजपा आमदार विजेंदर गुप्ता यांची वर्णी लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर उपाध्यक्षपदी मोहन सिंग बिश्त यांच्या नावाची चर्चा आहे.
Delhi Cabinet Ministers Swearing Ceremony LIVE Updates: दिल्लीच्या मंत्रिमंडळात कुणाचा समावेश?
दिल्लीच्या नव्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्रीपदी शालिमार बाग मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडून आलेल्या रेखा गुप्ता यांचा शपथविधी होणार आहे. त्याव्यतिरिक्त परवेश वर्मा (नवी दिल्ली), मनजिंदर सिंग सिरसा (राजौरी गार्डन), रविंद्र कुमार इंद्रज (बवाना), कपिल मिश्रा (करवाल नगर), आशिष सूद (जनकपुरी) आणि पंकज कुमार सिंग (विकासपुरी) या आमदारांचा समावेश होणार आहे.
Delhi New Chief Minister Oath Ceremony LIVE Updates: चौथ्यांदा महिला मुख्यमंत्री…
दिल्लीत चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदी महिला विराजमान होणार आहे. याआधी भाजपाच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांनी अल्पकाळासाठी दिल्लीचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. त्यानंतर काँग्रेसच्या शीला दीक्षित यांनी दोन वेळा दिल्लीचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं होतं. आता रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत.
Delhi chief minister oath ceremony live updates: कोण राहणार उपस्थित?
रेखा गुप्ता यांच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री व भाजपशासित राज्यातील मंत्री सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
Delhi New CM Oath Ceremony LIVE Updates: राज्यपाल देणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
दिल्ली सरकार व दिल्लीचे नायब राज्यपाल यांच्यात गेल्या काही वर्षांत राजकीय तणावाचे अनेक प्रसंग उद्भवले. काही बाबतींत हे प्रकरण न्यायालयातदेखील गेलं. आता नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना भाजपाच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता व इतर मंत्र्यांना शपथ देणार आहेत.
Rekha Gupta Oath Ceremony LIVE Updates: दिग्गज नेत्यांची हजेरी
रेखा गुप्ता यांच्या शपथविधीसाठी भाजपातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर कला विश्वातील अनेक सेलिब्रिटी मंडळीही या सोगळ्याला उपस्थित असतील असं सांगितलं जात आहे.
Delhi New Chief Minister Oath Ceremony LIVE Updates: थोड्याच वेळात होणार सोगहळ्याला सुरुवात
रेखा गुप्ता यांच्या मुख्यमंत्रीपदी शपथविधी सोहळ्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. दिल्लीच्या रामलीला मैदानात हा शपथविधी सोहळा रंगणार आहे.
Delhi New Chief Minister Oath Ceremony LIVE Updates: दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता
दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ४८ जागांवर विजय मिळवत भारतीय जनता पक्षानं २७ वर्षांनंतर सत्ता पुन्हा मिळवली आहे. यानंतर पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांच्याकडे दिल्लीच्या किल्ल्या सोपवण्याचा निर्णय घेतल्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता यांची निवड. (Photo-ANI)
Delhi New Chief Minister Oath Ceremony LIVE Updates, 20 February 2025: दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता!