Delhi Police : दिल्लीमधील नांगलोई परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका कार चालकाने एका पोलीस हवालदाराला त्याच्या गाडीखाली चिरडल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला आहे. गाडी चालवणारा व्यक्ती हा मद्य पुरवठादार असल्याची माहिती सांगितली जात असून तो सध्या फरार झाला आहे. यासंदर्भात दिल्ली पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

माहितीनुसार, नांगलोई पोलीस ठाण्यात असलेले पोलीस हवालदार संदीप यांना एका चारचाकी गाडी बेदरकारपणे येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस हवालदाराने कार बेदरकारपणे चालवली जात असल्याचं पाहिलं आणि कार चालकाला गाडी बेदरकारपणे न चालवण्यास सांगितलं. मात्र, यावेळी अचानक ओव्हरटेक करणाऱ्या कारचा वेग वाढला आणि त्या कारने पोलीस हवालदार संदीप यांना पाठिमागून जोराची धडक दिली. तसेच पोलीस हवालदार संदीप यांना १० मीटरपर्यंत फरफटत नेलं. यानंतर पुन्हा पुढे उभ्या असलेल्या दुसऱ्या एका कारला त्या गाडीने धडक दिली.

हेही वाचा : Maihar Bus Accident : मैहरमध्ये बस-ट्रकचा भीषण अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू तर २० जण गंभीर जखमी

या घटनेनंतर पोलीस हवालदार संदीप यांना तत्काळ जवळच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पश्चिम विहार येथील दुसऱ्या एका रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, तोपर्यंत पोलीस हवालदार संदीप यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

दरम्यान, या घटनेसंदर्भात सीसीटीव्ही फुटेजनुसार, पोलीस हवालदार संदीप हे एका लेनमध्ये डावीकडे वळले आणि वॅगनआरला कारला वेग कमी करण्याचा इशारा दिला. मात्र, यावर वॅगनआरला कार चालकाने अचानक वेग वाढवला आणि पोलीस हवालदार संदीप यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली आणि दुचाकीसह हवालदार संदीप यांना १० मीटरपर्यंत फरफटत नेलं. यामध्ये हवालदार संदीप यांना डोक्याला मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे दिल्लीत मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणात आता आरोपीच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे. या घटनेत मृत्यू झालेले पोलीस हवालदार संदीप हे ३० वर्षांचा होते. या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.