Delhi Police : दिल्लीच्या नांगलोई परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी एका पोलीस हवालदाराला गाडीखाली चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. पोलीस हवालदार रात्रीच्या वेळी गस्तीवर असताना अज्ञात व्यक्तीने बेदरकारपणे गाडी चालवत गाडीखाली चिरडत १० मीटरपर्यंत फरफटत नेलं होतं. या घटनेत पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची सूत्र वेगाने फिरवत आरोपीचा शोध सुरु केला होता. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलीस हवालदार संदीप (वय ३०) यांच्या दुचाकीला आरोपींनी चारचाकीने पाठिमागून धडक देत संपवले आहे. विशेष म्हणजे आरोपींनी पोलीस हवालदार संदीप यांची गाडी जवळ येईपर्यंत वाट पाहिली. आरोपींमध्ये दोघांचा समावेश असून रजनीश आणि धर्मेंद्र असं त्यांची नावे असल्याची माहिती समोर आली आहे. यामधील रजनीश हा कार चालवत होता. यावेळी रजनीश हा धर्मेंद्रला असं म्हणाला की, ‘आज त्याला संपवूया’. यानंतर या दोघांनी संदीप यांच्या गाडीला पाठिमागून जोराची धडक दिली. यामध्ये पोलीस हवालदार संदीप हे गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले, घटना घडली त्या ठिकाणच्या नागरिकांनी संदीप यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तोपर्यंत पोलीस हवालदार संदीप यांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा : दीड लाखांचा iPhone ऑनलाईन मागवला, डिलिव्हरी मॅन येताच पैसे देण्याऐवजी त्याचाच जीव घेतला

एका आरोपीला अटक

दिल्लीत घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवत घटना घडली त्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यावेळी पोलिसांना दोन आरोपींवर संशय आला. यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत कसून चौकशी केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. दरम्यान, या घटनेतील चारचाकी गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

घटना घडली तेव्हा काय घडलं होतं?

आरोपी रात्रीच्यावेळी बेदरकारपणे गाडी चालवत होते. हे पाहून रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेले पोलीस हवालदार संदीप यांनी गाडी थांबण्यासं सांगितलं असता आरोपींनी गाडी न थांबवता पोलीस हवालदार संदीप यांच्या दुचाकीला पाठिमागून जोराची धडक दिली. त्यानंतर घटनास्थळावरून फरार झाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi police accused who crushed the constable under the car was arrested a major action by delhi police gkt