पीटीआय, निषेध
न्यूजक्लिक वृत्त संकेतस्थळाशी संबंधित पत्रकारांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईचा प्रेस क्लब ऑफ इंडियासह (पीसीआय) पत्रकारांच्या विविध संघटनांनी निषेध केला आहे. दिल्ली पोलिसांची कारवाई ही माध्यम स्वातंत्र्याची मुस्कटदाबी असल्याची टीका पत्रकारांची राष्ट्रीय संघटना, दिल्ली संघटना आणि केरळ संघटना यांनी एकत्रितपणे काढलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
आम्ही या घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत. पीसीआय पत्रकारांच्या पाठीशी आहे आणि सरकारने यासंबंधी तपशील जाहीर करावेत अशी आमची मागणी आहे. – प्रेस क्लब ऑफ इंडिया
त्यांना ताब्यात घेतले आहे, त्यांचे फोन व लॅपटॉप ताब्यात घेण्यात आले आहेत. हा सरकारच्या निरंकुश आणि धमकावणाऱ्या वर्तनाचा आणखी एक प्रकार आहे. – डिजिपब न्यूज इंडिया फाउंडेशन
हेही वाचा >>>“तुमच्या ४१ अधिकाऱ्यांना माघारी बोलवा, नाहीतर…”, भारताचा कॅनडाला इशारा; निज्जर हत्या प्रकरण चिघळणार?
‘न्यूजक्लिक’ने कामगार आणि शेतकऱ्यांच्या मुद्दय़ांवर वार्ताकन केल्यानंतर सरकार या संकेतस्थळाला लक्ष्य करत आहे. हा सरकारकडून माध्यमस्वातंत्र्याच्या मुस्कटदाबीचा आणखी एक प्रयत्न आहे. -राष्ट्रीय, दिल्ली, केरळ पत्रकार संघटना
आम्ही निष्पक्ष तपासाची मागणी करतो आणि दिल्ली पोलिसांनी या पत्रकारांना जाणीवपूर्वक लक्ष्य करून त्यांचा छळ करण्यापासून स्वत:ला रोखावे. – मुंबई प्रेस क्लब
प्रत्यक्ष गुन्हा घडला असेल तर कायद्याने आपले काम करावे हे आम्हाला मान्य आहे. त्याच वेळी योग्य कार्यपद्धतीचे पालन केले जावे. काही विशिष्ट गुन्ह्यांच्या तपासामुळे पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये. – एडिटर्स गिल़् ऑफ इंडिया
माध्यमांना स्वतंत्रपणे सरकारच्या धोरणांचे विश्लेषण करण्याचा अवकाश मिळाला नाही तर लोकशाही चैतन्यपूर्ण राहणार नाही. माध्यमांना निवडून आलेल्या सरकारचे अविरतपणे काम करता येईल याची खबरदारी घेण्याची जबाबदारी सरकारवर असते. – इंडियन विमेन प्रेस कॉर्प्स