दिल्लीतील आपच्या (AAP) कार्यक्रमात स्टेजवर जबरदस्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (narendra modi) फोटो लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. केंद्र सरकारनेच दिल्ली पोलिसांना असे करायला सांगितल्याचा आरोप आपचे मंत्री गापोळ राय (Gopal rai) यांनी केला आहे. याबाबत आप ने ट्वीट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
फोटो काढून टाकल्यास अटकेची धमकी
दिल्लीत केजरीवाल सरकार आणि उपराज्यापाल अनिल बैजल यांच्यात सरकारच्या कामकाजावरून सुरु असलेला वाद थांबण्यचा नाव घेत नाहीये. आता या वादाला नवीन तोंड फुटले आहे. केंद्र सरकारने दिल्ली पोलिसांना आदेश दिल्यानंतर पोलिसांनी आप सरकारच्या कार्यक्रमात जबरदस्ती नरेंद्र मोदींचा फोटो लावला असल्याचा आरोप आप मंत्र्यांकडून करण्यात आला आहे. एवढचं नाही तर हा फोटो काढून टाकल्यास अटकेची धमकीही देण्यात आली असल्याचे ‘आप’चे म्हणणे आहे.
हेही वाचा- वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला रस्त्यावर सापडले ४५ लाख रुपये; त्यानंतर जे काही केलं ते वाचून वाटेल अभिमान
दिल्ली सरकारच्या कार्यक्रमाचे रुपांतर मोदींच्या राजकीय कार्यक्रमात
दिल्ली सरकारकडून वन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाअंतर्गत एक लाख झाडे लावण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि उपराज्यपाल अनिल बैजल ( Anil Bijal) दोघेही हजर राहणार होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी परस्पर या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचा आरोप उपराज्यापालांनी केला आहे. मात्र, कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी दिल्ली पोलिसांनी जबदरस्ती स्टेजवर चढत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावला. दिल्ली सरकारच्या या कार्यक्रमाचे रुपांतर मोदींच्या राजकीय कार्यक्रमात झाले आहे. त्यामुळे मी आणि केजरीवाल आता या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याची माहिती राय यांनी दिली आहे.