श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होते आहेत. दरम्यान, आज दिल्ली पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागले आहेत. पोलिसांनी आज आफताबच्या फ्लॅटची पुन्हा एकदा तपासणी केली. यावेळी पोलिसांना त्याच्या बाथरुमधील टाईल्सवर रक्ताचे नुमने मिळाले आहेत. हे रक्ताने नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त व्हायला किमान दोन आठवड्यांचा कालावधी लागणार आहे.
हेही वाचा – Shraddha Murder Case: चार सिम कार्ड, फ्रिज अन् सोशल मीडिया Accounts; आफताबसंदर्भात नवा धक्कादायक खुलासा
आज आढळलेले रक्ताचे नुमने या प्रकरणातील अत्यंत महत्त्वाचा पुरावा मानला जातो आहे. यापूर्वीही दिल्ली पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमला आफताबच्या फ्लॅटमधील स्वयंपाकघरातही काही रक्ताचे नमुने आढळले होते.
आज होणार आफताबची पॉलिग्राफ चाचणी?
काल आफताबची नार्को चाचणी होणार होती. मात्र, त्यापूर्वी होणाऱ्या पॉलीग्राफ चाचणीची परवानगी न मिळाल्याने ही नार्को चाचणी स्थगित करण्यात आली. दरम्यान, आज न्यायालयाने आफताबच्या पॉलीग्राफ चाचणीसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे आज किंवा उद्या त्याची पॉलीग्राफ चाचणी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – Yes I am guilty! श्रद्धाची हत्या केल्याची आफताबची न्यायालयात कबुली, म्हणाला “जे काही झालं ते…”
आफताबने दिली कबुली
दरम्यान, आज आफताबला कोठडी संपत असल्याने त्याला आज दिल्लीमधील साकेत कोर्टात हजर करण्यात आलं होते. यावेळी त्याने न्यायाधीशांसमोर आपणच श्रद्धाची हत्या केली असल्याची कबुली दिली आहे. तसेच न्यायालयाने आफताबच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे.