स्पॉट फिक्सिंगचा आरोप असलेल्या क्रिकेटपटू एस. श्रीशांत, अजित चंडिला, अंकित चव्हाण यांच्यासह एकूण २६ आरोपीविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदांतर्गत (मोक्का) कारवाई करण्याचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घेतला आहे. 
श्रीशांतसह अन्य आरोपींचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाकडे हस्तांतरित करण्याची मागणी पोलिसांनी दिल्लीच्या महानगरदंडाधिकाऱयांकडे केलीये. या सर्वांविरोधात मोक्का लावण्यात आल्यामुळे त्यांचे जामीनाचे अर्ज विशेष न्यायालयाकडे हस्तांतरित करण्याची मागणी करण्यात आलीये. दरम्यान, मोक्कानुसारही कारवाई करण्याचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घेतल्यामुळे आता या प्रकरणातील आरोपींना जामीन मिळणं कठीण होणार आहे. न्यायालयाने या प्रकरणातील एक आरोपी अंकित चव्हाणला लग्नासाठी तात्पुरता जामीन दिला होता. त्याच्या जामीनाची मुदतही मंगळवारीच संपुष्टात येत आहे.
स्पॉट फिक्सिंगप्रकरणाचे धागेदोरे कुख्यात दाऊद इब्राहिमपर्यंत पोहोचत असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाल्यामुळे या सर्व आरोपींविरुद्ध मोक्का लावण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 

Story img Loader