पठाणकोटमधून भाड्याने घेण्यात आलेली पांढऱ्या रंगाची आल्टो कार बेपत्ता झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी राजधानीमध्ये अतिदक्षतेचा इशारा जारी केला. या गाडीचा चालक बुधवारी मृतावस्थेत आढळून आला. त्यामुळे ही गाडी भाड्याने घेणाऱ्या तीन जणांभोवती संशयाचे वातावरण तयार झाले आहे. विजय कुमार असे या गाडीच्या चालकाचे नाव आहे. पोलिसांनी कांग्रा जिल्ह्यातील काल्ता पुलाजवळून त्याचा मृतदेह ताब्यात घेतला.
पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बेपत्ता गाडीबद्दल आणि त्यातून प्रवास करणाऱ्या तीन संशयितांबद्दल सावध राहण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे. या गाडीचा क्रमांक एचपी ०१ डी २४४० असा आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत या गाडीबद्दल माहिती पोहोचविण्याची विनंतीही पोलिसांनी केली आहे.
दोन जानेवारी रोजी पठाणकोटमधील हवाईतळावर जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी हल्ला केल्यानंतर संपूर्ण देशभरातच दक्षता बाळगण्याची सूचना देण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jan 2016 रोजी प्रकाशित
पठाणकोटमधून कार बेपत्ता झाल्यानंतर दिल्लीत अतिदक्षतेचा इशारा
ही गाडी भाड्याने घेणाऱ्या तीन जणांभोवती संशयाचे वातावरण तयार झाले आहे
Written by विश्वनाथ गरुड
Updated:

First published on: 22-01-2016 at 16:03 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi police issues alert for missing car hired from pathankot