प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल भारतीय जनता पक्षातून (भाजप) हकालपट्टी करण्यात आलेल्या नुपूर शर्मा आणि तिच्या कुटुंबीयांना दिल्ली पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे. अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली. तत्पूर्वी, दिल्ली पोलिसांनी नुपूर शर्मा यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याच्या तक्रारींसंदर्भात एफआयआर नोंदवला होता. आपल्याला जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या मिळत आहेत, अशी तक्रार नुपूर शर्मा यांनी करत पोलिसांकडे सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“नुपूर शर्मा यांनी आरोप केला होता की त्यांना धमक्या मिळत आहेत आणि त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांना त्रास दिला जात आहे, त्यानंतर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे,” अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मा यांनी २८ मे रोजी सायबर सेल युनिटकडे विविध व्यक्तींविरुद्ध जीवे मारण्याच्या धमक्यांसंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम ५०६ (गुन्हेगारी धमकावणे), ५०७ (निनावी संप्रेषणाद्वारे गुन्हेगारी धमकी) आणि ५०९ (शब्द, हावभाव किंवा कृती) अंतर्गत अज्ञात व्यक्तींविरोधात. एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “तपासादरम्यान शर्मा यांनी काही लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या चौकशीनंतर या प्रकरणात आयपीसी कलम १५३ ए जोडण्यात आले. तसेच, ट्वीटरला नोटीस पाठवण्यात आली आहे आणि त्यांच्या प्रतिसादाची प्रतीक्षा आहे. या प्रकरणाची तपासणी सुरू आहे.”

दरम्यान, भाजपाने रविवारी नुपूर शर्मा यांना निलंबित केले आणि दिल्लीचे मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांची देखील हकालपट्टी केली.

भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या प्रेषित मोहम्मद पैगंबरांसंदर्भातील वादग्रस्त वक्तव्यानंतर भारताला आखाती देशांच्या विरोधाला सामोरं जावं लागत आहे. इराण, कतार आणि कुवेत या देशांनी तेथील भारतीय दूतावासांना स्पष्टीकरणासाठी पाचारण केलं असून सौदी अरेबियानेही निषेध नोंदवला आहे. त्यातच आता तालिबानची सत्ता असणाऱ्या अफगाणिस्तान सरकारनेही भारताला धर्मांधतेवरुन सुनावलं आहे. तालिबानच्या प्रवक्त्यांनी भारताला मुस्लिमांच्या भावना भडकावू नयेत अशी विनंती केली आहे.