इंडियन प्रिमिअर लीगचे मिळकतीचे स्रोत जाणून घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी सचिव संजय जगदाळे यांना बोलावले आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचा तपास करणाऱया दिल्ली पोलिसांनी आयपीएलचा डोलारा नेमका कशावर उभा आहे, हे जाणून घेण्यासाठी जगदाळे यांना बोलावले असल्याची माहिती मिळालीये.
आयपीएलमध्ये सहभागी संघांचे मालक आणि क्रिकेटपटू यांच्यामध्ये झालेल्या करारात बीसीसीआयची भूमिका काय असते, हे देखील दिल्ली पोलिसांना जाणून घ्यायचंय. स्पॉट फिक्सिंगवरून दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या एस. श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांच्याविरुद्ध राजस्थान रॉयल्स संघाने पोलिसांकडे तक्रार दाखल केलीये. या तिन्ही खेळाडूंनी संघासोबत केलेल्या करारचे उल्लंघन केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
जगदाळे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलेले नाही. त्यांच्याकडून केवळ आम्हाला काही गोष्टींची माहिती घ्यायची आहे, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱयाने सांगितले. गेल्या शुक्रवारीच जगदाळे यांनी बीसीसीआयच्या सचिवपदाचा राजीनामा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा