एका ऑनलाईन गेमिंग अ‍ॅपच्या मदतीने दिल्ली पोलिसांनी १६ वर्षीय बेपत्ता मुलीचा शोध घेतला आहे. रविवारी दिल्लीच्या चाण्यक्यपूरी भागातून ही मुलगी घर सोडून निघून गेली होती. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून या मुलीचा शोध घेण्यात येत होता. बेपत्ता मुलगी एका गेमिंग अ‍ॅपवर ऑनलाईन गेम खेळायची, अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली होती. या माहितीच्या आधारे शोध घेतल्यानंतर मंगळवारी सकाळी ही मुलगी पोलिसांना बंगला साहिब गुरुद्वारामध्ये सापडली.

Location Tracking : मोबाईलमधून ‘या’ पद्धतीने तुम्ही करू शकता कोणाचेही लोकेशन

बेपत्ता मुलगी तिच्या पालकांच्या फोनवर ऑनलाईन गेम खेळायची. काही गेमर्सच्या संपर्कात देखील ती होती. या ऑनलाईन गेमचा तपास करून पोलिसांनी एका गेमरशी संपर्क साधला. या गेमरच्या मदतीने बेपत्ता मुलीचे ठिकाण शोधण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. “आम्ही बेपत्ता मुलीचे संपूर्ण कॉल रेकॉर्ड्स तपासले. ती ऑनलाईन खेळत असलेल्या गेमचेही निरिक्षण केले. त्यातून राजस्थानमध्ये राहत असलेल्या तिच्या एका मित्राचा नंबर आम्हाला मिळाला. बेपत्ता मुलीने घर सोडण्यापूर्वी त्याच्याशी संपर्क साधला होता”, अशी माहिती नवी दिल्लीच्या पोलीस उपायुक्त अमृता गुगुलोथ यांनी दिली. सरोजिनी मार्केटपरिसरातील एका मंदिरात जाण्यासाठी तिने ऑटो केला होता, या गेमरने दिलेल्या माहितीच्या आधारे या परिसरात मुलीचा शोध घेण्यात आला. मात्र, या ठिकाणी मुलगी आढळून आली नाही.

विना इंटरनेट Movies करा Free मध्ये डाउनलोड; केंद्र सरकारचा महाराष्ट्रासाठी मोठा प्लॅन

त्यानंतर बेपत्ता मुलीने आपल्या एका मित्राला वेगळ्या नंबरवरून संपर्क साधल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हा नंबर ट्रेस केल्यानंतर बेपत्ता मुलगी गुरुद्वारात असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांच्या एका पथकाने तात्काळ गुरुद्वारातून या मुलीला ताब्यात घेतले. दरम्यान, सरोजिनी मार्केटमधील मंदिरात गेल्याचे या मुलीने चौकशीत कबूल केले. आईशी झालेल्या भांडणातून आपण घर सोडल्याचे या मुलीने पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले.

Story img Loader