दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्या कार्यालयाची सोमवारी तोडफोड करण्यात आली. वकिलांच्या एका गटाकडून ही तोडफोड करण्यात आल्याचे बोलले जात आहे. हल्याचं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाही.
दरम्यान, हल्लेखोरांची वकिल घोषणाबाजी करत थेट किरण बेदी यांच्या कृष्णानगर मतदार संघातील कार्यालयात घुसले आणि थेट तोडफोडीला सुरूवात केल्याचे उपस्थित भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तर, खुद्ध किरण बेदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हल्ल्याबद्दलच्या वृत्ताला दुजोरा दिला असून यामध्ये काही कार्यकर्ते जखमी झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. गेल्या काही वर्षांपासून दिल्लीतील वकिल आणि किरण बेदी यांच्यात वाद सुरू आहे. बेदी पोलिस उपायुक्त असतानाच्या काळात दिल्ली न्यायालयाबाहेर आंदोलन करणाऱया वकिलांवर लाठीमार झाला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा