दिल्ली शहरात प्रदुषणाने गाठलेली कमालीची पातळी सध्या देशभरात चर्चेचा विषय बनली आहे. मात्र, अजूनही दिल्लीतील लोकांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतलेली दिसत नाही. सध्या सुरू असलेल्या छठपूजा उत्सवाच्या दरम्यान दिल्लीकरांकडून फोडण्यात आलेल्या फटाक्यांवरून त्यांना परिस्थितीशी काहीच देणेघेणे नसल्याचे दिसत आहे. मात्र, प्रत्यक्षात हे प्रदुषण कितपत गंभीर आहे, हे दर्शविणारी दोन छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
खत विभागाचे संयुक्त सचिव धर्मा पाल यांनी त्यांच्या विमान प्रवासादरम्यान ही छायाचित्रे टिपली आहेत. या छायाचित्रातून प्रदुषणामुळे पूर्व आणि उत्तर भारतातील आकाशात झालेले बदल स्पष्टपणे दिसत आहेत. यामध्ये पूर्व भारतातून हिमालयीन पर्वतरांग सहजपणे दृष्टीस पडत आहे. तर उत्तर भारतात दाट धुक्याच्या चादरीमुळे हिमालयाची पर्वतरांग दिसेनासी झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दिल्लीवरून विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांनीही अशाप्रकारचा अनुभव सांगितला. प्रवाशांच्या माहितीनुसार, दिल्ली विमानतळावर विमान उतरेपर्यंत धुक्याच्या चादरीमुळे शहराचे दर्शन होणे, अशक्य झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा