नवी दिल्ली :दिल्ली हे जगातील सर्वात प्रदूषित शहर असल्याचे एका नव्या अभ्यासात आढळले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा दिल्लीतील प्रदूषण असेच कायम राहिल्यास दिल्लीवासीयांचे सरासरी आयुर्मान ११ वर्षे ९ महिन्यांनी घटण्याची भीती या अभ्यासात व्यक्त करण्यात आली आहे.

शिकागो विद्यापीठाच्या ‘एनर्जी पॉलिसी इन्स्टिटय़ूट’ने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार ‘डब्ल्यूएचओ’ने निश्चित केलेल्या प्रदूषणमर्यादा दिल्लीत भेदली जात असून, तेथील प्रदूषणाची सध्याची पातळी कायम राहिल्यास, एक कोटी ८० लाख दिल्लीवासीयांचे सरासरी आयुर्मान ११.९ वर्षांनी आणि राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार सरासरी ८.५ वर्षांनी घटण्याचा धोका आहे. पंजाबमधील पठाणकोट या सर्वात कमी प्रदूषित जिल्ह्यातही ‘डब्ल्यूएचओ’च्या (पान ४ वर) (पान १ वरून) मर्यादेपेक्षा सूक्ष्म कणांचे प्रदूषण सात पटींनी जास्त आहे. सध्याचा हाच स्तर येथे कायम राहिल्यास तेथील नागरिकांचेही आयुर्मान ३.१ वर्षांनी घटू शकते, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Sudhir Mungantiwar, Sudhir Mungantiwar Nagpur,
काँग्रेसची सध्याची अवस्था ‘चाची ४२०’ प्रमाणे, मुनगंटीवार यांची टीका
Devendra Fadnavis Dharni, Chikhaldara Skywalk Work,
‘चिखलदरा स्‍कायवॉकचे काम महाविकास आघाडीने थांबविले’, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणीसांचा आरोप
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी

हेही वाचा >>> कॅलिफोर्नियात जातिभेदविरोधी विधेयकाला मंजुरी; अमेरिकेतील पहिलेच राज्य

भारताच्या लोकसंख्येपैकी ६७.४ टक्के लोक हे देशाने निश्चित केलेल्या राष्ट्रीय वायू गुणवत्ता मानक-४० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरपेक्षा जास्त असलेल्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. ‘डब्ल्यूएचओ’ने निश्चित केलेल्या ५ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर या मर्यादेतील आयुर्मानाच्या तुलनेत भारतातील हवेतील सूक्ष्म कणांचे प्रदूषण (पार्टिक्युलेट मॅटर २.५) भारतीयांचे सरासरी आयुर्मान पाच वर्षे तीन महिन्यांनी घटवते. 

भारतातील सरासरी वार्षिक कण प्रदूषण (पार्टिक्युलेट मॅटर-पीएम) १९९८ ते २०२१ पर्यंत ६७.७ टक्क्यांनी वाढले. त्यामुळे सरासरी आयुर्मान २.३ वर्षांनी घटले. २०१३ ते २०२१ या कालावधीत जगातील ५९.१ टक्के प्रदूषणवाढीसाठी भारत जबाबदार होता, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारताच्या उत्तर भागातील मैदानी प्रदेशांतील सर्वाधिक प्रदूषित भागात सध्याची प्रदूषण पातळी कायम राहिल्यास ५२ कोटी १२ लाख नागरिक किंवा देशाच्या ३८.९ टक्के लोकसंख्येचे आयुर्मान ‘डब्ल्यूएचओ’च्या मर्यादेच्या तुलनेत आठ वर्षे आणि राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांच्या तुलनेत ४.५ वर्षांनी कमी होण्याची शक्यता आहे.

जागतिक धोका काय?

वायू प्रदूषण हा मानवी आरोग्यासाठी जगातील सर्वात मोठा बाह्य धोका आहे. परंतु, जागतिक आयुर्मानाचा विचार करता त्याचा सर्वाधिक नकारात्मक परिणाम अवघ्या सहा देशांवर पडत आहे. त्यात भारतासह बांगलादेश, पाकिस्तान, चीन, नायजेरिया आणि इंडोनेशिया यांचा समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता करण्यासाठी जर जगाने सूक्ष्म कणांचे प्रदूषण (पीएम २.५) कायमचे कमी केले तर सरासरी मानवी आयुर्मान २.३ वर्षांनी वाढेल.

अहवालात काय?

* धोकादायक कण प्रदूषण असलेल्या भागांत एक अब्ज तीन कोटी भारतीयांचे वास्तव्य.

* पठाणकोट या सर्वात कमी प्रदूषित जिल्ह्यातही मर्यादेपेक्षा कण प्रदूषण सात पटींनी जास्त.

* भारताच्या उत्तरेतील मैदानी प्रदेशांत प्रदूषण पातळी सर्वाधिक

* २०१३ ते २०२१ मध्ये जगातील ५९.१ टक्के प्रदूषणवाढीसाठी भारत जबाबदार.