Delhi Rohini Blast News Update : राजधानी दिल्लीतील रोहिणी येथील प्रशांत विहार भागात झालेल्या स्फोटामागे खलिस्तानी समर्थक गट असल्याचा दावा दिल्ली पोलिसांकडून केला जातोय. कारण, तपासादरम्यान टेलिग्रामवरील एका चॅनेलवर अशाच एका घटनेचे सीसीटीव्ही फुटेज शेअर करण्यात आले आहेत. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व दाव्यांची तपासणी केली जात आहे. पोलिसांनी टेलीग्रामला पत्र लिहिले आहे. ज्या ग्रुपवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय त्या चॅनेलची माहिती पोलिसांनी टेलिग्रामकडून मागवली आहे. रोहिणीचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) अमित गोयल म्हणाले, “या टप्प्यावर काहीही सांगणे कठीण आहे… तपास सुरू आहे.

हेही वाचा >> दिल्लीतल्या स्फोटाचं कारण काय? घटनास्थळावरील ‘पांढऱ्या पावडर’मुळे फॉरेन्सिक टीम चकीत; दहशतवादी कटाचा संशय?

दिल्लीतील रोहिणी येथे नक्की काय घडलं?

रविवारी सकाळी, रोहिणीच्या सेक्टर १४ मधील सीआरपीएफ शाळेजवळ एक मोठा स्फोट ऐकू आला, यामुळे पोलीस आणि बॉम्ब पथकाला अग्निशमन दलासह घटनास्थळी धाव घेण्यास सांगितले. स्फोटक हा क्रूड बॉम्ब असल्याचे मानले जात असून त्या ठिकाणी पोटॅशियम क्लोरेट, हायड्रोजन पेरॉक्साईड आणि काही विद्युत तारा सापडल्या आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) पुढील तपासासाठी रोहिणी बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांकडून घेण्याची शक्यता आहे.

दिल्ली पोलीस काय म्हणाले?

“एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, “दिल्ली पोलिसांनी टेलिग्राम मेसेंजरला पत्र लिहून टेलिग्राम चॅनल ‘जस्टिस लीग इंडिया’ वर तपशील मागवला आहे. रोहिणी येथील प्रशांत विहार येथील सीआरपीएफ शाळेबाहेर झालेल्या स्फोटानंतर या स्फोटाच्या सीसीटीव्ही फुटेजसह घटनेची पोस्ट चॅनलवर शेअर केली. पोलीस इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरूनही माहिती घेत आहेत. टेलिग्रामने अद्याप दिल्ली पोलिसांना प्रतिसाद दिलेला नाही. तपास सुरू आहे, स्फोटासंदर्भात अद्याप कोणत्याही संघटनेचे नाव समोर आलेले नाही. सर्व बाजूंनी तपास केला जात आहे”, असं दिल्ली पोलीस म्हणाले असल्याचं एएनआयने सांगितलं.

स्फोटामुळे शॉकवेव्हची निर्मिती

स्फोटक सामग्री अशाप्रकारे पेरण्यात आली होती की त्यामुळे शॉकवेव्ह निर्माण झाली. यामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठं नुकसान झाले. तपास करणाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घन किंवा द्रव स्फोटक पदार्थ अतिशय गरम, दाट आणि उच्च-दाब वायूमध्ये बदलतात. स्फोटानंतर हा वायू फार वेगाने पसरतो यामुळे हवेत शॉक वेव्ह निर्माण होतात. शॉकवेव्ह सुपरसॉनिक वेगाने आजूबाजूच्या भागात पसरतं. यामुळे स्फोटानंतर परिसरातील इमारती आणि वाहनांच्या काचा फुटल्या. तसंच, सीआरपीएफ शाळेच्या भीतींनाही तडे गेले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi rohini blast telegram channel claims involvement of pro khalistan groups sgk