दिल्लीतील हत्या प्रकरणावरुन संपूर्ण देशभरात खळबळ माजलेली असताना रोज नवनवे खुलासे होत आहेत. त्यातच आता श्रद्धा वालकरची हत्या करुन मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताब पूनावालाने पोलिसांकडे आपल्याला गांजाचं व्यसन असल्याचा खुलासा केला आहे. इतकंच नाही, तर १८ मे रोजी श्रद्धाची हत्या केली तेव्हा आपण गांजाच्या प्रभावाखाली होतो असंही त्याने पोलिसांना सांगितलं असल्याची सूत्रांची माहिती आहे. आफताबच्या या कबुलीमुळे आता या तपासाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे.

चौकशीदरम्यान आफताबने पोलिसांना सांगितलं की, श्रद्धा आपल्याला नेहमी गांजाचं व्यसन करत असल्याने ओरडायची. हत्येच्या दिवशी दोघांमध्ये घरखर्च तसंच मुंबईतून दिल्लीत सामान घेऊन कोण येणार यावरुन दिवसभर भांडण सुरु होतं.

What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Myra Vaikul
मायरा वायकूळ रडण्याचा सीन शूट करण्यासाठी काय करायची? म्हणाली, “मी एका जागेवर…”
Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांचा मोठा खुलासा, “त्यादिवशी आरोपी आणि एपीआयचं चहाचं बिल मीच दिलं, त्यानंतर त्याने…”
rakesh roshan
“वाईट बातमी…”, गोळीबाराच्या घटनेनंतरही राकेश रोशन यांना हृतिकसाठी अंडरवर्ल्डमधून यायचे धमक्यांचे फोन; खुलासा करत म्हणाले…
Baba Siddique Murder Case
Baba Siddique : “बाबा सिद्दिकींना ठार मारा, तुम्हाला पाच लाख रुपये, फ्लॅट आणि…”, अनमोल बिश्नोईने हल्लेखोरांना काय सांगितलं?
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”
Ankit Barai 20 year old youth died in an explosion at an ordnance factory Calling boy to come back father fainted
स्फोटात गमावलेल्या मुलाला परत ये…ची हाक देत वडील बेशुद्ध… बहिणीचे तर अश्रूच गोठले….

Shraddha Murder Case: किचनमध्ये रक्ताचे डाग, नाल्यात हाडं; आफताबच्या फ्लॅटमध्ये फॉरेन्सिक टीमला काय सापडलं?

या भांडणानंतर आफताब घराबाहेर गेला आणि गांजाचं सेवन करुन परतला. आपण श्रद्धाची हत्या करणार नव्हतो, पण गांजाचं सेवन केलं असल्याने त्याच्या प्रभावाखाली आपल्या हातून गुन्हा घडला असा दावा त्याने पोलिसांकडे केला आहे.

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ मे रोजी श्रद्धाची रात्री ९ ते १० दरम्यान गळा दाबून हत्या करण्यात आली. यानंतर आफताब रात्रभर मृतदेहाशेजारी बसून होता. यावेळी तो गांजाने भरलेली सिगारेट ओढत होता.

Shraddha Murder Case: तिचा गळा दाबणं सोपं होतं, पण…; मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताबचा पोलिसांकडे धक्कादायक खुलासा

आफताबने बाथरुमच्या आतमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. आफताबने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रक्त वाहून जावं यासाठी त्याने मृतदेहाचे तुकडे करताना नळ सुरु ठेवला होता. पाण्याचं बिल जास्त असल्याने पोलिसांना संशय आला होता. आता हेच बिल या प्रकरणात महत्वाचा पुरावा ठरणार आहे. तसंच फॉरेन्सिकला किचनमध्ये रक्ताचे डाग आढळले आहेत.

हत्या केल्यानंतर आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. मृतदेहाचे तुकडे ठेवण्यासाठी त्याने ३०० लीटरचा एक फ्रीज खरेदी केला. नंतर रोज रात्री घराबाहेर पडत त्याने वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेहाचे तुकडे फेकून देत विल्हेवाट लावली.

PHOTOS: मुंडकं कापून फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आफताब रोज श्रद्धाचा चेहरा पाहायचा, धक्कादायक खुलासे ऐकून पोलीसही चक्रावले

याशिवाय मेहरुलीच्या नाल्यात काही हाडं सापडली असून ही श्रद्धाची असावीत असा त्यांचा अंदाज आहे. आफतबाने मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची ठिकाणं सांगितल्यानंतर ही हाडं सापडली आहेत. जर श्रद्धाचा डीएनए या हाडांशी जुळला तर पोलिसांकडे मोठा पुरावा असेल.

दिल्ली कोर्टाने आफताबला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याशिवाय पोलिसांना नार्को-चाचणी करण्यासही परवानगीही दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस आफताबला घेऊन हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडलाही जाणार आहे. आफताब आणि श्रद्धा फिरण्यासाठी गेलेल्या ठिकाणांची पोलीस पाहणी करणार आहेत. चौकशीदरम्यान, आफताबने आपण देहरादूनमध्येही मृतदेहाचे काही तुकडे फेकल्याचं सांगितलं होतं.

पोलिसांच्या हाती काही पुरावे अद्यापही लागलेले नाहीत. यामध्ये आफताबने वापरलेला चाकू, श्रद्धाचं डोकं किंवा ओळख सिद्ध करणारा शरिराचा इतर भाग, तिने त्यादिवशी घातलेले कपडे आणि मोबाईल फोन यांचा समावेश आहे. आफताबने मोबाईल दिल्ली किंवा मुंबईत फेकून दिला असल्याचा संशय आहे.

Story img Loader