दिल्लीत रविवारी पहाटे मनाला विषण्ण करणारी घटना घडली. कारच्या धडकेत मृत्यू झाल्यानंतर दुचाकीस्वार २० वर्षीय तरुणीला कारचालकाने १२ किलोमीटरपर्यंत फरफरट नेलं. यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला आहे. रस्त्यावर नग्नावस्थेत तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अशात या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. या तरुणीबरोबर दुचाकीवर आणखी एक तरुणी असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्लीत सुलतानपुरी भागात एका कारने दुचाकीस्वार तरुणीला धडक दिल्यानंतर तिचा मृत्यू झाला. त्यानंतरही कार न थांबवता चालकाने मृत तरुणीला सुलतानपूरी ते कांझावालापर्यंत फरफटत नेलं. अपघाताचा तपास करताना तरुणीबरोबर तिची मैत्रिण दुचाकीवर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

हेही वाचा : स्कुटीला धडक दिल्यानंतर १२ किमीपर्यंत फरफटत नेलं, मृतदेह गाडीखाली असतानाही थांबले नाहीत, पाहा व्हिडीओ

रात्री १ वाजून ४५ मिनीटांनी या दोघी एका हॉटेलमधून पार्टी करुन बाहेर पडल्या होत्या. कारने दुचाकीला धडक दिल्यानंतर पीडित तरुणीची मैत्रिण जखमी झाली होती. अपघातानंतर ती घरी निघून गेली. याप्रकरणी दिल्ली पोलीस जखमी तरुणीचा आज ( ३ नोव्हेंबर ) जवाब नोंदवणार आहेत.

हेही वाचा : “आई मी रात्री १० वाजेपर्यंत घरी येते,” दिल्ली अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे ‘ते’ ठरले शेवटचे शब्द

दरम्यान, अपघातानंतर पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पाचही आरोपींवर आणखी गुन्हा दाखल करण्यात येतील, असं विशेष पोलीस आयुक्त ( कायदा आणि सुव्यवस्था ) सागर प्रीत हुड्डांनी सांगितलं. आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल न करता निष्काळीपणा आणि गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi sultanpuri accident anjali singh friend at time of accident say police ssa