दिल्लीत एकावन्न वर्षे वयाच्या एका महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. ती गाझियाबाद येथील इस्ट मॉडेल टाऊनची रहिवासी होती. तिला गंगाराम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात २१ डिसेंबरपासून ठेवले होते कारण तिची प्रकृती गंभीर होती. तिला दाखल केले तेव्हाच ती गंभीर अवस्थेत होती. तिची फुफ्फुसे निकामी झाली होती व तिला कृत्रिम श्वासावर ठेवण्यात आले होते. सर गंगाराम रुग्णालयाने तिला स्वाइन फ्लू झाल्याचे निदान केले होते. त्यापूर्वी तिच्यावर गाझियाबाद येथील यशोदा रुग्णालयात उपचार करण्यात आले होते व नंतर गुरगाव येथील कोलंबिया आशिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिंदी साहित्यिक नंद चतुर्वेदी कालवश
उदयपूर: प्रसिद्ध हिंदूी कवी व साहित्यिक नंद चतुर्वेदी यांचे वयाच्या ९१व्या वर्षी येथे निधन झाले. ख्रिसमसच्या दिवशी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात चार मुलगे व दोन मुली आहेत. चतुर्वेदी हे समाजवादी होते व त्यांचा जन्म झालवार येथे १९२३ मध्ये झाला, पण सध्या ते उदयपूरला राहात होते. हिंदी विषयात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली होती. विद्याभवन रूरल इन्स्टिटय़ूटचे ते माजी प्राध्यापक होते. ‘यह समय मामुली नही’, ‘इमानदार’ ‘दुनिया के लिये ही’ त्यांची पुस्तके प्रसिद्ध होती. के. के. बिर्ला फाऊंडेशनने त्यांना बिहारी पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. साहित्य वाचस्पती पुरस्कार, मीरा पुरस्कार हे पुरस्कार त्यांना मिळाले होते.

ब्लॉगरला अटक
टय़ूनिस: लष्करी अधिकाऱ्यांना बदनाम केल्यानंतर परदेशातून परतणाऱ्या एका ब्लॉगरला पोलिसांनी अटक केली असे एका वकिलाने सांगितले. यासिने अयारी (वय ३३) असे त्याचे नाव असून त्याला टय़ूनिस-कार्थेज विमानतळावर अटक करून तुरुंगात टाकण्यात आले. न्यायालयाने त्याला कोठडी दिली. लष्कराच्या वकिलाने सांगितले की, अयारी याला १८ नोव्हेंबर रोजी त्याच्या अनुपस्थितीत लष्करी अधिकाऱ्यांची बदनामी केल्याच्या प्रकरणी तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. अयारी हा फ्रान्समधून परत येताच त्याला तुरुंगात टाकण्यात आले.