Air India Flight : एअर इंडियाचं दिल्लीहून ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या विमानाने टेक ऑफ केल्यानंतर या विमानात तुफानी टर्ब्युलन्स आला. त्यामुळे सात प्रवासी जखमी झाले आहेत. या नंतर क्रू मेंबर्सनी ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या एका डॉक्टरांच्या आणि नर्सच्या मदतीने प्रवाशांवर उपचार केले. एअर इंडिया विमान क्रमांक B787-800 या विमानाने दिल्लीहून ऑस्ट्रेलियासाठी उड्डाण केलं. त्यानंतर अचानक टर्ब्युलन्स इतक्या मोठ्या प्रमाणावर आला की सात प्रवासी जखमी झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुदैवाने जखमींपैकी एकाही रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली नाही. DGCA ने स्पष्ट केलं की मंगळवारी ही घटना घडली. एअर इंडियाचं विमान सिडनीला पोहचल्यानंतर सिडनीच्या विमानतळावर प्रवाशांना आरोग्य सुविधा पुरवण्यात आल्या.

एअर इंडियाने या घटनेबाबत काय म्हटलंय?

१६ मे २०२३ ला आमच्या विमानाने सिडनीसाठी उड्डाण केलं. त्यानंतर जोरदार हवेमुळे विमानात टर्ब्युलन्स वाढला. हा टर्ब्युलन्स इतका वाढला की प्रवासी जखमी झाले. मात्र विमानाने सिडनीला सुरक्षित लँडिंग केलं. त्यानंतर प्रवाशांना वैद्यकीय सेवा पुरवली आहे असंही एअर इंडियाकडून सांगण्यात आलं आहे.

या महिन्याच्या सुरुवातीलाच एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये एका प्रवाशाला विंचू चावला होता. ही घटना एअर इंडियाच्या नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या विमानात घडली होती

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi sydney air india flight heavy turbulence mid air several passengers injured scj