Robbery To Travel Mahakumbh : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी दिल्लीतील एका तरुणाने तीन घरांमध्ये चोरी केल्याचे समोर आले आहे. यासाठी अरविंद आलिया भोला याने १७ जानेवारी रोजी दिल्लीतील राजपुरी परिसरातील तीन घरांमधून महागड्या वस्तू आणि दागिने चोरले. त्यानंतर पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. दिल्लीतील द्वारका पोलिसांनी चौकशी केल्यानंतर अरविंद म्हणाला, तो आणि त्याच्या मित्रांना प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला जायचे आहे. त्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते, म्हणून चोरी केली. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याची आई घरकाम करते आणि त्याला सात भावंडे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दरम्यान, अरविंदने चोरी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याच्याविरुद्ध चोरी आणि घरफोडीचे एकून १६ गुन्हे दाखल आहेत. चोरी आणि घरफोडी प्रकरणी त्याला २०२० मध्ये पहिल्यांदाच अटक करण्यात आली होती. हा तरुण ड्रग्जच्या आहारी गेला असल्यामुळे सतत चोऱ्या करत असल्याचेही समोर आले आहे.

महाकुंभमधील चोरट्यांची टोळी गजाआड

दुसरीकडे प्रयागराजमध्येही महाकुंभमेळ्यादरम्यान चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. प्रयागराज गुन्हे शाखेने नुकतेच आठ चोरांच्या एका टोळीला अटक केली आहे. हे आरोपी उत्तर प्रदेशातीलच गोंडा जिल्ह्यातून आले होते आणि कुंभमेळ्यात चोरी करत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचे साहित्य जप्त केले आहे.

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे सर्व आरोपी चोरीच्या घटनांमध्ये सहभागी होते आणि मोठ्या प्रमाणात लोकांना लक्ष्य करत होते. पोलिसांनी सर्वांना अटक करून तुरुंगात पाठवले आहे. याव्यतिरिक्त, त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. महाकुंभसारख्या मोठ्या कार्यक्रमात सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत जेणेकरून अशा घटनांना पूर्णपणे आळा बसेल.

३७ हजार पोलीस तैनात

यंदाच्या कुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने ३७ हजारापेक्षा अधिक पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. यात १,३७८ महिला अधिकारी, सायबर तज्ज्ञ आणि गुप्तचर पथके समाविष्ट आहेत. महाकुंभमधील हालचालींवर देखरेखीसाठी उच्चस्तरीय उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मेळ्याचे इंटिग्रेटेड कमांड आणि कंट्रोल सेंटर या संपूर्ण यंत्रणेचा मेंदू आहे. इथे अधिकाऱ्यांना उच्चस्तरीय संगणक प्रणालीद्वारे संपूर्ण मैदानावर लक्ष ठेवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनासाठी २,७५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने ४० कोटी भाविकांच्या हालचालींवर लक्ष ठेवता येणार आहे.

Live Updates