उत्तर दिल्लीतील बारा हिंदू राव भागातील तीन मजली इमारत कोसळून बुधवारी दोघांचा बळी गेला. अजून एक जण या घटनेत जखमी झाला आहे.
नक्की (६८) आणि त्यांचा मुलगा बंटी (३५) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. इमारत कोसळल्यानंतर हे दोघेही त्याच्या ढिगाऱयाखाली सापडले. अग्निशामक दलाच्या जवानांनी मातीचा ढिगारा हलविल्यानंतर त्यांना या दोघांचे मृतदेह तिथे आढळले. गंगाराम रुग्णालयातील डॉक्टरांनी या दोघांना मृत घोषित केले. दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव सलमान असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बारा हिंदू राव भागातील हाजी मेहबूब गल्लीमध्ये ही इमारत आहे. बुधवारी सकाळी ती सुमारे साडेसातच्या सुमारास कोसळली. त्यानंतर पावणे आठच्या सुमारास अग्निशामक दलाला त्याबद्दल माहिती देण्यात आली. इमारतीच्या ढिगाऱया खालून तीन जणांना बाहेर काढण्यात आले असून, अजून काही जण त्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे, असे उत्तर विभागाचे पोलीस उपायुक्त सिंधू पिल्लई यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi three storey building collapses in bara hindu rao area two dead
Show comments