दिल्लीत १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीच्या हत्याकाडांने देश हादरला आहे. अशात आणखी एका खळबळजनक घटना समोर आली आहे. एका महिलेने नशेत आपल्या मैत्रिणीचा चाकूने वार करून खून केला आहे. मृत महिलेने मैत्रिणीच्या निधन झालेल्या वडिलांना शिवी दिली होती. याच कारणावरून तरुणीने हे धक्कादायक कृत्य केलं आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.

मृत महिलेचं नाव राणी ( ३५ वर्ष ) असून, अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव सपना ( ३६ वर्ष ) आहे. राणी आणि सपना दिल्लीतील टाली येथील अरुण नगर येथे एका खोलीत राहत होत्या. राणी गुरुग्राममध्ये ब्युटी पार्लरचं काम करत असे. तर, सपना वेटर आणि डेकोरेटचं काम करत होती. सपनाचा घटस्फोट झाला असून, तिला एक मुलगीही आहे.

Crime News
Crime News : होमिओपॅथी डॉक्टरचे भयानक कृत्य! गर्लफ्रेंड आणि तिच्या वडिलांचा मृतदेह ४ महिने घरात दडवला, कुजू नयेत म्हणून…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
old man attacked with iron rod after dispute over financial affairs of running Bhisi
भिशीच्या वादातून लोखंडी सळईने वृद्धाचा खून; महिलेसह दोघे अटकेत
Case filed against women who brutally beat three-year-old son
तीन वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण करणाऱ्या आईविरोधात गुन्हा
Man dies after cousin inserts compressor pipe in private parts
काही सेकंदाची मस्करी जीवावर बेतली; गुदद्वाराजवळ कम्प्रेसर पाईप नेल्याने तरुणाचा मृत्यू
pimpri female patient dies due to guillain barre syndrome
पिंपरी : गुइलेन बॅरे सिंड्रोमची लागण झालेल्या महिलेचा न्यूमोनियामुळे मृत्यू
Woman stabbed to death with scissors over family dispute in Kharadi area Pune news
पुणे: कौटुंबिक वादातून महिलेवर कात्रीने वार करुन खून; खराडी भागातील घटना, पती अटकेत
ambulance
शेवटी मृत्यूने गाठलेच! महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, पण रुग्णवाहिकेतील ‘या’ चुकीमुळे गेला जीव

हेही वाचा : तरुणीने लग्नास दिला नकार, माथेफिरू तरुणाच्या कृत्याने उडाली खळबळ; नेमकं काय घडलं?

२९ मेला राणी, सपना, नेहा, तेंजिन आणि चार ते पाच महिलांची अरुण नगर येथील एका घरात पार्टी सुरु होती. येथे दारू पिण्यावरून सपना आणि राणीमध्ये जोरदार वाद झाला.

हेही वाचा : दिल्लीतील ‘त्या’ तरुणीच्या मानेवर अन् पोटावर २१ नव्हे तर…; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर

त्यानंतर राणी आणि सपना यांनी उशीरा रात्री आपल्या घरी गेल्या. त्यानंतर सुद्धा दोघीही दारू पित होत्या. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास राणीने सपनाच्या मृत वडिलांना शिवी दिली. याच रागातून सपनाने राणीच्या छातीत चाकू खुपसला. यात राणीचा मृत्यू झाला. राणीच्या खूनानंतर सपना तिच्या मृतदेहाजवळच झोपली होती.

याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा राणीचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी सपनावर कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

Story img Loader