एखाद्या पक्ष्याने विमानाला धडक दिल्यास काय होऊ शकते, याचा प्रत्यय गुरूवारी भुवनेश्वरमध्ये आला. विस्तारा एअरलाईन्सच्या दिल्ली- भुवनेश्वर विमानाचे पक्ष्याची धडक बसल्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. भुवनेश्वरच्या बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर विमानाचे लँडिंग होत असताना हा प्रकार घडला. यानंतर विमान धावपट्टीवर सुरक्षितपणे उतरविण्यात आले. या दुर्घटनेत विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप असले तरी विमानाची अवस्था मात्र पाहण्यासारखी झाली आहे. या अपघातग्रस्त विमानाची काही छायाचित्रे ट्विटरवर पाहायला मिळत आहेत. एखादा पक्षी विमानाचे इतके मोठे नुकसान कसे काय करू शकतो, याबद्दल अनेकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पक्ष्याच्या धडकेमुळे विमानाचा पुढचा भाग दाबला गेला असून काहीठिकाणी तुटलादेखील आहे. दरम्यान, या घटनेनंतर तातडीने या विमानाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. मात्र, त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा