Goa Tourist Crime : दिल्लीतील एका पर्यटकाला गोव्यातील मँड्रेम येथे एका स्थानिक महिलेला गाडीखाली चिरडल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. अंगावरून गाडी गेल्यानंतर या महिलेचा मृत्यू झाला आहे. यानंतर पोलिसांनी दीपक बत्रा नावाच्या पर्यटकाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला मारियाफेलिझ फर्नांडिस आणि त्यांच्या मुलाने त्यांच्या पाळीव कुत्र्‍यांना त्रास होत असल्याच्या कारणाने काही पर्यटकांच्या गटाला त्यांच्या पाळीव कुत्र्‍याला त्यांच्या घराजवळ येऊ देऊ नका अशी विनंती केली होती. पण यावरून स्थानिक कुटुंब आणि दिल्लीतील पर्यटकांमध्ये जोरदार भांडण झाले. हा वाद पुढे चांगलाच पेटल्याचे पाहायला मिळाले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, यांच्यातील हाणामारीदरम्यान पर्यटक असलेल्या कुटुंबातील एका महिलेने मारियाफेलिझ यांचे केस धरून ओढले, ज्यामुळे त्या खाली पडल्या. त्यांचा मुलगा जोसेफ मदत करण्यासाठी धावत आला तेव्हा त्याच्या खांद्याला दुखापत झाली.एका प्रत्यक्षदर्शीच्या मदतीने, मारियाफेलिझ यांना जवळच खुर्चीवर बसवण्यात आले.

काही वेळाने दीपक बत्रा याने त्याच रस्त्यावरून त्याची गाडी वेगाने चालवत आणली आणि जाणूनबुजून मारियाफेलिझ यांना धडक दिली आणि त्यांना जवळजवळ दहा मीटर फरपटत नेले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान या घटनेबद्दल इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.

स्थानिकांनी सांगितले की, बत्राने रागाच्या भरात हे कृत्य केले आणि तो धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून तात्काळ फरार झाला. पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी केल्यानंतर दीपक बत्रा याच्याविरोधात १०३ आणि २८१ या भारतीय न्याय संहितेच्या कलमांअर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील चौकशी केली जात आहे.