दिल्ली विद्यापीठातील इंग्रजीचे प्राध्यापक जी़ एऩ साईबाबा यांची गुरुवारी महाराष्ट्र पोलिसांनी चौकशी केली़ माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून गेल्या तीन महिन्यांत दुसऱ्यांदा त्यांची चौकशी करण्यात आली आह़े
महाराष्ट्रातील नक्षलप्रभावित गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांच्या एका पथकाने सकाळी अनेक तास त्यांची चौकशी केली़ गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्याच्या मध्यात पोलिसांनी त्यांच्या संगणकाची न्यायवैद्यक तपासणी केली होती़ त्यातून सापडलेल्या धाग्यादोऱ्यांच्या आधारे ही चौकशी करण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितल़े सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही चौकशी सुरू होती़
छत्तीसगढमधील जंगलांतील माओवादी कार्यकर्ते आणि साईबाबा यांच्यामधील दुवा म्हणून काम करीत असल्याचा दावा जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी हेम मिश्रा याने पोलिसांपुढे केला होता़ त्याला काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती़ त्यानंतर साईबाबा यांचे नाव या प्रकरणाशी जोडले गेल़े
साईबाबा गुप्तपणे माओवाद्यांसाठी काम करतातच, परंतु त्याव्यतिरिक्त ते एक संस्था चालवितात. ही संस्थादेखील माओवाद्यांसाठी काम करते, असे पोलिसांचे आरोप आहेत़ साईबाबा यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत़ मिश्रा याच्याव्यतिरिक्त कोबाड गंध्या आणि बचा प्रसाद सिंग या दोन अटकेत असलेल्या माओवादी म्होरक्यांनीसुद्धा साईबाबा दिल्लीतून संपर्कात असल्याचे सांगितल्याचे पोलिसांचे म्हणणे आह़े
दरम्यान, या पोलीस चौकशीवर साईबाबा यांच्या सहकाऱ्यांनी सडकून टीका केली आह़े साईबाबा यांनी मात्र चौकशीदरम्यान पोलिसांना पूर्ण सहकार्य केल्याचे सांगत, आता हे प्रकरण इथेच संपेल, अशी आशा व्यक्त केली आह़े
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा