नवी दिल्ली : दिल्लीतील अलिपूर भागात शुक्रवारी दुपारी बांधकाम सुरू असलेल्या गोदामाची भिंत कोसळून पाच जण ठार तर आठ जण जखमी झाले. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता असून शोध मोहीम सुरू आहे. भिंत कोसळलेला गोदाम ५ हजार चौरस फुटांचे आहे. हे बांधकाम बेकायदा असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

हेही वाचा >>> हमीद अन्सारी यांची पाकिस्तानी पत्रकाराशी मैत्री; काँग्रेसने आरोप फेटाळल्यानंतर भाजपाने समोर आणला फोटो

मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतील अलिपूर भागात शुक्रवारी दुपारी एका गोदामाचे बांधकाम सुरु होते. मात्र यावेळी येथे जळपास १०० फूट लाब असलेली भिंत केसळली. या दुर्घनेत एकूण पाच जण ठार झाले तर आठ जण जखमी झाले आहेत. कोसळलेल्या भिंतीखाली आणखी काही कामगार दबले गेल्याची शक्यता आहे. याबाबतची अधिक माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. “घटनास्थळी दाखल झाल्यानंतर येथे आम्हाला एक १०० फूट लाबं आणि जवळपास १५ फूट रुंद बांधकाम सुरु असलेली भिंत कोसळलेली दिसली. येथे एका गोदामाचे काम सुरु होते. या परिसरात जवळपास २० कामगार काम करत होते. हे सर्व कर्मचारी पडलेल्या भिंतीखाली दबले होते,” असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा >>> Mohammed Zubair : अल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद झुबेर यांना जामीन मंजूर

तसेच, “घटनास्थळी पोहोचताच आम्ही बचावकार्य सुरु केले. घटनास्थळावरुन आम्ही एकूण १३ कामगारांना बाहेर काढले असून उपचारासाठी त्यांना नेरळमधील सत्यवादी राजा हरिश्चंद्र रुग्णालयात पाठवले आहे. यातील पाच जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत,” असेदेखील पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा >>> रशियाकडून एस-४०० मिसाईल डिफेन्स सिस्टिम्स खरेदी करण्याचा भारताचा मार्ग मोगळा, अमेरिकेकडून निर्बंधांमध्ये सूट

दरम्यान, या दुर्घटनेनंत पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दु:ख व्यक्त केले. मी स्वत: बचावकार्याकडे लक्ष ठेवून आहे, असे केजरीवाल यांनी सांगितले.

Story img Loader