दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने सफदरगंज एन्क्लेव्ह येथील लॉजमधील व्यापाऱ्याच्या हत्येचा उलगडा केला आहे. व्यापारी दीपक सेठी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. तपासादरम्यान, पोलिसांना लॉजच्या खोलीत एक चिठ्ठी सापडली होती. त्यावर लिहिलं होतं की, “तुम्ही चांगले आहात, सॉरी, सॉरी, सॉरी, माझा नाईलाज होता, त्यामुळेच तुमच्यासोबत असं कृत्य करावं लागलं. कृपया मला माफ करा.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरोपी २९ वर्षीय निकिता उर्फ निक्कीकडून एक बॅग, मृतकाची सोन्याची अंगठी, मोबाईल फोन, बनावट आधार कार्ड आणि तिचा खासगी फोन जप्त करण्यात आला आहे. आरोपी महिलेवर आधीपासूनच मॉडेल टाऊन येथे एका खटल्याची नोंद आहे.

या प्रकरणाची माहिती देताना विशेष पोलिस आयुक्त रवींद्र कुमार यादव यांनी सांगितल की, ३१ मार्च रोजी सफदरजंग एन्क्लेव्ह येथील एका लॉजच्या खोलीत व्यापारी दीपक सेठी यांचा मृतदेह सापडला होता. लॉजच्या सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांना कळले की दीपक सेठी यांच्यासोबत एक महिलादेखील तिथे आली होती. रात्री उशिरा १२.२५ च्या सुमारास ती महिला काही साहित्य सोबत घेऊन एकटीच लॉजमधून बाहेर पडली. पोलिसांना हॉटेलमधून तरुणीचे आधार कार्ड मिळाले. पोलिसांनी आधार कार्डवरील माहितीच्या आधारे तपास करण्याचा प्रयत्न केला परंतु ते आधार कार्ड बनावट असल्याचे समोर आले. पोलिसांनी या महिलेचे सीडीआर डिटेल्स तपासण्यासाठी लॉजच्या आसपास लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यास सुरुवात केली.

नायजेरियन व्यक्तीकडून फोन रिचार्ज करून घेतला

पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर समजलं की, २० मार्च रोजी संत गढ परिसरातील एका महिलेने नायजेरियातील रहिवासी चिडे याच्याकडून तिचा मोबाइल फोन रिचार्ज करून घेतला होता. त्या माहितीच्या आधारे पोलीस चिडेपर्यंत पोहोचले. चिडेने सांगितलं की, त्याची पार्टनर मधुमिता हिची मैत्रीण निकीताचा फोन त्याने रिचार्ज केला होता. चिडे आणि मधुमिताने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी महिलेला नोएडा येथून अटक केली. चौकशीदरम्यान निकिताने सांगितले की, तिची आणि मधुमिताची भेट तुरुंगात झाली होती. दोघींनी तिथेच हा कट रचला होता.

हे ही वाचा >> “अजित पवार नॉट रिचेबल?” विरोधी पक्षनेत्यांनी पत्रकारांना सुनावलं, म्हणाले, “बंद करा ते”

त्यानंतर निकिताने व्यापारी दीपक सेठी यांना लॉजवर बोलावलं. लॉजवर सेठी यांना बेशुद्ध करून त्यांच्याकडील पैसे आणि दागिने लुटून निकीता बाहेर पडली. लॉजच्या बाहेर मधुमिता कार घेऊन उभी होती. त्यानंतर दोघी फरार झाल्या. दरम्यान, लॉजमधून बाहेर पडण्यापूर्वी निकीताने एक चिठ्ठी लिहून तिथे ठेवली होती. पोलिसांनी सांगितलं की, ज्या रूममध्ये दीपक सेठी यांचा मृतदेह सापडला तिथे मद्याच्या बाटल्या आणि वेगवेगळी औषधं देखील सापडली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi woman arrested safdarjung enclave lodge murder case asc