Divorce Post: गेल्या काही वर्षांमध्ये देशभरात पती-पत्नींमधील नातेसंबंधातील तणावामुळे घटस्फोटाचे प्रमाणा वाढल्याचे पाहायला मिळत आहे. इतकेच नव्हे तर तणावपूर्ण नातेसंबंधांमुळे जोडप्यांमध्ये वाद आणि आत्महत्याही वाढल्याचे पाहायला मिळत आहे. अशात आता इंटरनेटवर दिल्लीती एका महिलेचे पोस्ट व्हायरल झाली आहे. त्या पोस्टमध्ये महिलेने, “घटस्फोट झाला आहे, पराभूत नाही”, असे लिहिले आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी या महिलेला पाठींबा देत त्यांच्या वैय्यक्तिक आयुष्यातील गोष्टीही शेअर केल्या आहेत.

घटस्फोट झाला आहे, पराभूत नाही!

लिंक्डइनवर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये, ह्यूमन रिसोर्स क्षेत्रात काम करणाऱ्या गार्गी कालरा यांनी घटस्फोटानंतरच्या त्यांच्या आयुष्याबाबत सांगितले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कोणाला प्रेरणा देण्याचा किंवा सहानभुती मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी पोस्टचा मथला एका ओळीत “घटस्फोट झाला आहे, पराभूत नाही!”, असे लिहिले आहे.

“मी घटस्फोटित आहे. कोणाकडून सहानुभूती मिळवण्याचा किंवा कोणी माझे कौतुक करावे याची अपक्षा करत नाही. आपल्याला इतर लोकांना टॅग द्यायला आवडते, नाही का? एक शब्द, एक लेबल आणि अचानक, आपली एक ओळख तयार होते. मी माझी मान उंच ठेवण्यासाठी आणि माझ्या निर्णयाचा कधीही पश्चात्ताप न करण्यासाठी धारणा, अनपेक्षित सल्ला आणि अपेक्षांच्या ओझ्याविरुद्ध लढली आहे”.

त्यामुळे फरक पडत नाही

गार्गी कालरा यांनी पुढे सांगितले की, “अनेकांप्रमाणे, त्यांनीही चुकीच्या ठिकाणी मान्यता मिळवण्याचा प्रयत्न केला होता. पण, मा जे सांगत आहे ते सत्य आहे. याला १० लोकांनी पाठिंबा दिल्याने किंवा न दिल्याने काही फरक पडत नाही.”

गार्गी कालरा यांनी पोस्टच्या शेवटी म्हटले की, “मी अजूनही शिकत आहे, अजूनही वाढत आहे. आणि माझ्याप्रमाणे याच अडचणींचा सामना करणाऱ्या लोकांशी झालेल्या प्रत्येक संभाषणातून मला जाणवते की, आपण सर्वजण स्वतःच्या लढाया लढत आहोत.”

अभिनंदन…

दरम्यान गार्गी यांची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेक सोशल मीडिया युजर्सनी त्यांना पाठिंबा देत त्यांच्या आयुष्यातीलही अशाच गोष्टी शेअर केल्या आहे. यावेळी एक युजर म्हणाला, “दुःखांपेक्षा तुम्ही स्वतःला निवडल्याबद्दल अभिनंदन.”

यावेळी आणखी एक युजर म्हणाला की, “माझ्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. हे सोपे नव्हते, परंतु त्यामुळे मला खरोखर माझे कोण आहेत हे शोधण्यास मदत झाली. मी स्वतःबद्दल खूप अफवा ऐकल्या आहेत, लोक माझ्याबद्दल वाईट बोलतात कारण मी स्वतःला निवडले. धन्यवाद.”