दिल्लीमध्ये २२ वर्षीय महिलेला मंकीपॉक्सची लागण झाली आहे. या महिलेसह दिल्लीमध्ये मंकीपॉक्सबाधितांचा आकडा ५ वर गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही महिला मूळची आफ्रिकेची असून काही दिवसांपूर्वी ती नायजेरिया देशातून प्रवास करून आलेली आहे. सध्या तिला लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात (LNJP) दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा >>> ‘क्लीनचिट’ मिळाल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, आर्यन खान ड्रग्स प्रकरणाचाही केला उल्लेख, म्हणाले…

मंकीपॉक्सशी संबंधित लक्षणं आढळल्यानंतर या महिलेची चाचणी करण्यात आली होती. चाचणी सकारात्मक आल्यानंतर दोन दिवसांपूर्वी या महिलेला (LNJP) रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मंकीपॉक्सची लागण झालेली दिल्लीतील ही दुसरी महिला आहे. या महिलेसह देशात मंकिपॉक्सग्रस्त रुग्णांची संख्या १० वर पोहोचली आहे. दिल्लीतील पाच पैकी ४ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आलाय.

हेही वाचा >>> Sonia Gandhi Covid Positive: सोनिया गांधी करोना पॉझिटिव्ह; दोन महिन्यात दुसऱ्यांदा झाली लागण

एखादा व्यक्ती दीर्घकाळा मंकीपॉक्सग्रस्त रुग्णाच्या संपर्कात राहिला तर त्यालादेखील हा आजार होण्याची शक्यता आहे. या आजाराचा वाढता संसर्ग लक्षात घेता केंद्रीय मंत्रालयाने काही सूचना जारी केल्या आहेत. हा आजार पसरू नये म्हणून मंकीपॉक्सग्रस्त रुग्णाला इतरांपासून वेगळे ठेवावे. तसेच हँड सॅनिटायझ वापरावे, साबण आणि पाण्याने हात धुवावेत. रुग्णाची काळजी घेताना तोंडाला मास्क लावावे, तसेच हातमोजे खालूनच रुग्णाजवळ जावे, असे निर्देश केंद्र सरकारने जारी केले आहेत.

Story img Loader