नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नव्याने सापडत असलेल्या करोना रुग्णात ८० टक्के जणांना डेल्टा या उपप्रकाराचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे, असे सार्स सीओव्ही जिनॉमिक्स कॉन्सर्टियमचे सह अध्यक्ष डॉ. एन.के. अरोरा यांनी सांगितले. रुग्णांची संख्या जर नवीन उपप्रकार आले तर वाढू शकते असेही त्यांनी म्हटले आहे.

अल्फा या उपप्रकारापेक्षा डेल्टा हा उपप्रकार  ४०-६० टक्के अधिक संसर्गजन्य असून तो आता ८० देशात पसरला आहे. त्यात ब्रिटन, अमेरिका व सिंगापूर यांचा समावेश आहे. डेल्टा प्लसचे एवाय १ व एवाय २ हे प्रकार ११ राज्यातील ५५-६० टक्के  रुग्णात दिसून आले आहे.  महाराष्ट्र, तमिळनाडू, मध्य प्रदेश या राज्यांचा त्यात समावेश आहे. या विषाणूची प्रसार क्षमता व इतर बाबी तसेच लशींना प्रतिकार करण्याची त्याची क्षमता याबाबत अभ्यास सुरू आहे, असे डॉ. अरोरा यांनी म्हटले असल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

डेल्टा विषाणूच्या काटेरी प्रथिनाचा जो भाग एसीइ रिसेप्टरला चिकटतो त्यात बदल होत असून ही उत्परिवर्तने सातत्याने होत असल्याने हा विषाणू घातक ठरत आहे. या विषाणूचा काटेरी भाग पेशीवर चपखल बसतो व नंतर विषाणू पेशीत प्रविष्ट होतो.

देशात आणखी ३८,१६४ रुग्ण

दरम्यान, देशात एका दिवसात ३८ हजार १६४ जणांना करोनची लागण झाल्याने बाधितांची एकूण संख्या तीन कोटी ११ लाख ४४ हजार २२९ वर पोहोचली आहे, तर गेल्या २४ तासांत करोनामुळे ४९९ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या चार लाख १४ हजार १०८ वर पोहोचली.

२४ दिवसांत ३० ते ४० कोटी लोकांचे लसीकरण

सर्वाना मोफत लस मोहिमेत गेल्या २४ दिवसांत ३०-४० कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले असून याउलट आधीच्या काळात १० कोटी लोकांचे लसीकरण करण्यास ८५ दिवस लागले होते असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले. ते म्हणाले की, कोविड १९ लसीकरणात २१ जूनपासून नवा टप्पा सुरू होत आहे. जास्त लशी उपलब्ध करून मोहीम राबवण्यात येणार असून राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी त्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे.  केंद्र सरकार खरेदी व पुरवठा करताना ७५ टक्के लशी यापुढील काळात मोफत देणार आहे.   भारतात ४०.६० कोटी लोकांचे लसीकरण झाले असल्याचे सोमवारच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.