राज्यातील गेंडय़ांच्या अवैध शिकारीच्या वाढत्या घटना लक्षात घेता केंद्र सरकारने यासंदर्भात केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागार्माफत चौकशी करावी, अशी मागणी आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगई यांनी केली आहे.
काजीरंगा नॅशनल पार्क आणि अन्य भागातील वन्यजीवांच्या शिकारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे आढळले आहे. या घटनांमागे राजकीय षड्यंत्र, असामाजिक तत्त्व आणि वनविभागातील कर्मचाऱ्यांच्या परस्पर सहकार्याने होत असल्याचे मुख्यमंत्री गोगई यांनी रविवारी पत्रकारांना सांगितले. यापूर्वी घडलेल्या सात घटनांची गुन्हे अन्वेषण विभागामार्फत तपासणी सुरू आहे. तर चार घटनांच्या तपासावर गुन्हे अन्वेषण विभाग लक्ष ठेवून आहे.

Story img Loader