कोळसा खाणवाटप घोटाळ्याची चौकशी सीबीआय करीत असून त्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर हस्तक्षेप केला जात असल्याने विशेष तपास पथक स्थापन करावे, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी केली आहे. यूपीए सरकार सीबीआयला स्वतंत्रपणे काम करू देत नसल्याचा आरोपही जेटली यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणातील संपूर्ण सत्य सांगण्यापासून सीबीआयला रोखले जात असून हा न्यायप्रशासनातील हस्तक्षेप आहे, असा आरोपही जेटली यांनी केला आहे. सीबीआय सत्य शोधून काढू शकत नाही आणि एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्याने तसा प्रयत्न केलाच, तर त्याला यूपीए सरकार स्वतंत्रपणे काम करू देत नाही, असे जेटली यांनी वार्ताहरांना सांगितले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनीही सरकारवर टीका केली आहे.

Story img Loader