अयोध्येत बाबरी मशिदीच्या ठिकाणी राम मंदिर उभारले असून २२ जानेवारी रोजी मंदिराचे उदघाटन होत असल्यामुळे संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. या वातावरणात बिहारच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी केलेले एक विधान वादाचे कारण ठरू शकते. ‘मुघलांनी भारतावर शासन केल्यामुळे भारतातील लोकशाही बळकट राहिली’, असे विधान या मंत्र्यानी केले आहे. बिहारचे इमारत बांधकाम मंत्री अशोक चौधरी म्हणाले, “हमारा लोकतंत्र बळकट आहे कारण मुघलांनी आपल्यावर शासन केले. तसेच त्यांनी ब्रिटिशांप्रमाणे आपली संपत्ती लुटून नेली नाही.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अशोक चौधरी पुढे म्हणाले, “मुघलांनी आपल्या देशातून पळ काढला नाही. त्यांचे जे काही होते, ते याच देशात राहिले. मुघलांनी त्यांच्या राजवटीत इस्लाम धर्माचा प्रचार केला असला तरी त्यानी ब्रिटिशांप्रमाणे आपल्याला लुटले नाही. ब्रिटिशांनी आपल्या देशातील संपत्ती लुटून त्यांच्या देशात नेली. आपल्याला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करून ब्रिटिशांनी त्यांचे घर भरले.” अशोक चौधरी हे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे निकटवर्तीय समजले जातात. याबाबतचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

हे वाचा >> इंडिया आघाडीत नितीश कुमार यांना महत्त्वाची जबाबदारी मिळणार? मल्लिकार्जुन खरगे अध्यक्षपदी?

दरम्यान चौधरी यांनी भाजपावर आरोप करताना त्यांनी राम मंदिराचे मार्केटिंग करून धर्माचे राजकारण केले असल्याची टीका केली. “राम मंदिराचे राजकारण करणे योग्य नाही. केंद्र सरकारने वाढती बेरोजगारी आणि महागाई याकडे लक्ष दिले पाहीजे. रामाचे नाव घेऊन कोणताही व्यक्ती उपाशीपोटी कसा काय राहू शकतो?”, असाही सवाल चौधरी यांनी उपस्थित केला.

भाजपाने राम मंदिर निर्माणाचे श्रेय घेत असताना देशातील इतर समस्यांकडे डोळेझाक केली आहे, असेही चौधरी म्हणाले. राम मंदिराचे उदघाटन करत असताना या देशातील बेरोजगारी संपविण्यासाठी केंद्र सरकारने योजना जाहीर केल्या पाहीजेत, असाही सल्ला अशोक चौधरी यांनी दिला.

आणखी वाचा >> जदयू पक्षातील नेते नाराज? खुद्द नितीश कुमार यांनीच दिलं उत्तर, म्हणाले; “आमच्या…”

जदयू पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष लल्लन सिंह यांना बाजूला सारून नितीश कुमार स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर जदयू पक्ष कमकुवत झाल्याची टीका भाजपाने केली होती. या टीकेला उत्तर देताना चौधरी म्हणाले, आमचा पक्ष कमकुवत झाला, या सर्व बिनबुडाच्या चर्चा आहेत. नितीश कुमार हेच मुख्यमंत्रीपदावर राहणार असून आमचा पक्ष आधीपेक्षाही अधिक बळकट झाला असल्याचे ते म्हणाले.