२०१९ सालापर्यंत देशाला भाजपमुक्त करणे, हेच तृणमूल काँग्रेसचे उद्दिष्ट असेल, असे सांगत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. त्या बुधवारी कोलकातामध्ये आयोजित करण्यात आलेल्या शहीद दिनाच्या कार्यक्रमात बोलत होत्या. ‘२०१९ मध्ये भाजप भारत छोडो’ हाच आमच्या पक्षाचा नारा असेल, असे यावेळी ममतांनी सांगितले. लोकशाही, निधर्मीवाद आणि मानवी हक्कांना भाजपच्या राजवटीत धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही सर्व विरोधी पक्षांची मदत घेऊ, असेही ममता यांनी स्पष्ट केले. यापूर्वीही ममतांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपची सत्ता उलथवून लावण्यासाठी राष्ट्रीय आघाडी स्थापन करण्याचे मनसुबे बोलून दाखवले आहेत. भाजपला विरोध करणाऱ्या कोणत्याही पक्षाला पश्चिम बंगाल पाठिंबा देईल. या पार्श्वभूमीवर ममतांनी ७ ऑगस्टपासून ‘भाजप भारत छोडो’ आंदोलन छेडले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा