Kamala Harris : अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी ५ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाकडून कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ही लढत होणार आहे. या निवडणुकीमधून अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांनी माघार घेतलेली आहे. दरम्यान, या निवडणुकीमुळे अमेरिकेच्या राजकारणातही डेमोक्रॅटिक पक्ष आणि रिपब्लिकन पक्षात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. यातच डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस या दोन्ही उमेदवारांकडून मोठमोठी आश्वासने दिले जात आहेत. यातच डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी आता गांजा (marijuana) कायदेशीर करण्याच्या संदर्भात आश्वासन दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कमला हॅरिस यांनी या संदर्भात म्हटलं आहे की, जर त्या आमेरिकेची निवडणूक जिंकल्या तर गांजा कायदेशीर ठरवतील. तसेच कमला हॅरिस यांनी यासंदर्भातील एक पोस्ट एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये कमला हॅरिस यांनी म्हटलं आहे की, गांजा (marijuana) सेवन केल्याबद्दल कोणालाही तुरुंगात जाण्याची वेळ येऊ नये. गांजामुळे कुणालाही शिक्षा होता कामा नये.” दरम्यान, कमला हॅरिस यांनी गांजा कायदेशीर करण्याच्या बाजूने मवाळ भूमिका दाखवली आहे. तसेच गांजावरील फेडरल बंदी संपुष्टात आणण्याच्या दिशेने महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या संदर्भात त्यांनी संकेतही दिले आहेत.

हेही वाचा : Surinder Choudhary: भाजपा प्रदेशाध्यक्षांचा पराभव केलेल्या नेत्याची जम्मू-काश्मीरच्या उपमुख्यमंत्रीपदी वर्णी; कोण आहेत सुरिंदर चौधरी?

दरम्यान, मंगळवारी डेट्रॉईट, मिशिगन येथे अमेरिकन रेडिओ होस्ट चारलामाग्ने था गॉड यांनी आयोजित केलेल्या टाऊन हॉलमध्ये बोलत असताना कमला हॅरिस यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली. तसेच गांजाच्या पुनर्निर्धारण प्रक्रियेच्या संथ गतीबद्दल निराशा व्यक्त करत सरकारला दोष दिला. यावेळी कमला हॅरिस यांनी देशभरात मनोरंजक गांजाची कायदेशीर लागवड आणि वितरण सुनिश्चित करण्यासाठी योग्य पाऊल उचलण्याचे संकेत दिले आहेत. यासंदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

दरम्यान, अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक अवघ्या काही आठवड्यांवर आली आहे. उमेदवार आणि मतदार दोघेही अंतिम टप्प्याच्या तयारीत व्यस्त आहेत. काही दिवसांपूर्वी फिलाडेल्फिया झालेल्या अध्यक्षीय चर्चेदरम्यान उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक मुद्द्यांवर आपली मते मांडली. अनेक विषयांवर वेगवेगळी मते असल्याचंही तेव्हा पाहायला मिळालं. मात्र, आता कमला हॅरिस यांनी गांजा कायदेशीर करण्याच्या संदर्भात दिलेल्या आश्वासनामुळे चर्चा रंगली आहे. दरम्यान, गांजाच्या वापरावरील गेल्या अनेक वर्षांची फेडरल बंदीमध्ये बदल घडवून आणण्याच्या संभाव्य निर्णयासंदर्भात कमला हॅरिस यांनी मोठं आश्वासन दिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Democratic party candidate kamala harris big statement on marijuana legal in united states country in north america gkt