पीटीआय, लंडन : सध्या जर्मन स्टेट सव्‍‌र्हिसेसच्या ताब्यात असलेली दोन वर्षांची बालिका अरिहा शहा हिला तिच्या भारतीय पालकांच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी जर्मनीतील भारतीय समुदायाच्या लोकांनी फ्रँकफर्ट येथे निदर्शने केली. अरिहा हिला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन निदर्शकांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताचा तिरंगा राष्ट्रध्वज हाती घेतलेल्या या निदर्शकांनी फलकांवर ‘मोदीजी अरिहाला वाचवा, अरिहा भारतीय आहे’, असे लिहिले होते. धारा आणि भावेश शहा हे अरिहाचे माता-पिता आहेत. या बालिकेचा छळ झाल्याचा आक्षेप घेत सप्टेंबर २०२१ मध्ये जर्मन अधिकाऱ्यांनी तिला सरकारच्या ताब्यात घेतले आहे. तेव्हापासून तिला परत आणण्यासाठी शहा दाम्पत्याचे प्रयत्न सुरू आहेत. गतवर्षी डिसेंबरमध्ये भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि जर्मनीचे परराष्ट्रमंत्री अ‍ॅनालेना बएरबॉक यांच्यातील चर्चेत या बालिकेचा मुद्दा होता. परराष्ट्र खात्याच्या नुकत्याच झालेल्या साप्ताहिक आढाव्यातही यावर चर्चा झाली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demonstrations of indians in germany for the release of ariha shah ysh