पोर्न स्टारने दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात ट्रम्प यांची सरशी

पोर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्स हिने दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या  दाव्यात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सरशी झाली असून अमेरिकी संघराज्य न्यायालयाने तिचा दावा फेटाळला आहे.

डॅनियल्स हिचे खरे नाव स्टीफनी क्लिफर्ड असून तिने अध्यक्ष ट्रम्प यांच्यावर आणखी एक दावा दाखल केला आहे त्यात  नोव्हेंबर २०१६ मधील अध्यक्षीय निवडणुकीच्या वेळी दोघांतील संबंधांची वाच्यता न करण्यासाठी ट्रम्प यांच्या वकिलाने १ लाख ३० हजार डॉलर्स दिले होते असे तिचे म्हणणे आहे.

अमेरिकी न्यायाधीश एस.जेम्स ओटेरो यांनी डॅनियल्स हिने ट्रम्प यांच्याविरोधात दाखल केलेला अब्रुनुकसानीचा  दावा फेटाळून लावला. ट्रम्प यांनी ट्विटरवर असे म्हटले होते की, पोर्न अभिनेत्री असलेल्या डॅनियल्स हिने वर्षभरापूर्वीच्या संबंधाचे प्रकरण उकरून काही दावे केले होते. तिला गप्प बसवण्यासाठी प्रयत्न केल्याचा शोधही तिने लावला आहे. ट्रम्प यांचा ट्विट संदेश हा अमेरिकी राजकारण व सार्वजनिक जीवनाशी विसंगत नसून त्यात केवळ शाब्दिक अतिशयोक्ती आहे, हा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला.

अमेरिकी राज्यघटनेतील पहिल्या सुधारणेनुसार (फर्स्ट अमेंडमेंट) वक्तव्यातील अतिशयोक्ती हा गुन्हा ठरत नाही. ट्रम्प यांचे वकील चार्लस हार्डर यांनी सांगितले की, हा निकाल म्हणजे अध्यक्ष ट्रम्प यांचा विजय तर स्टॉर्मी डॅनिएलचा पराभव आहे.

डॅनियल्स हिचे वकील मायकेल अ‍ॅव्हेनटी यांनी सांगितले की, ट्रम्प यांच्याशी २०२० मध्ये लढण्यास आपली तयारी आहे. त्यांनी नंतर ट्विर खात्यावर अपिलाची नोटीसही जारी केली आहे. डॅनियल्स हिला लासवेगास येथे एका पार्किंग परिसरात एका व्यक्तीने अध्यक्षांशी असलेल्या संबंधांबाबत कुठे वाच्यता करू नकोस अशी धमकी दिली होती. त्या व्यक्तीचे रेखाचित्र ट्रम्प यांनी ट्विटमध्ये टाकले होते, हा माध्यमांचा खोटेपणा आहे, मूर्ख बनवण्याचे उद्योग आहेत. अस्तित्वात नसलेल्या व्यक्तीचे रेखाचित्र तिने टाकले आहे. ट्रम्प यांच्या या ट्विटनंतर डॅनियल्सने ट्रम्प यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता.

डॅनियल्सला २०१६ मधील निवडणुकीवेळी गप्प बसण्यासाठी पैसे दिल्याची कबुली अध्यक्ष ट्रम्प यांचे माजी वकील मायकेल कोहेन  यांनी दिली होती.

Story img Loader