इसिसच्या विरोधातील आंतरराष्ट्रीय आघाडीत सामील व्हायचे की नाही याचा निर्णय सर्वस्वी भारतावर अवलंबून आहे असे अमेरिकेने म्हटले आहे.
भारत व अमेरिका यांच्यात इसिसच्या दहशतवादावर सखोल चर्चा झाली आहे. आता इसिसविरोधातील आंतरराष्ट्रीय आघाडीत सहभागी व्हायचे की नाही हे त्या देशाने ठरवायचे आहे असे ओबामा प्रशासनाने म्हटले आहे.
अमेरिकेच्या दक्षिण आशिया व मध्य आशियाविषयक सहायक परराष्ट्रमंत्री निशा देसाई बिस्वाल यांनी सांगितले, की या प्रश्नावर बरीच चर्चा झाली आहे. इसिसचा एकत्रितपणे मुकाबला कसा करता येईल यावरही विचारमंथन झाले आहे. इसिसविरोधातील आंतरराष्ट्रीय आघाडीत सामील व्हायचे की नाही याचा निर्णय भारताने घ्यायचा आहे, असे असले तरी दोन्ही देशांनी या दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यात एकत्र येऊन सहकार्य केले तर ते स्वागतार्हच आहे. इसिसने इजिप्तमधील २१ कोप्टिक ख्रिश्चनांना बॉम्बफेकीत ठार केल्याची जबाबदारी स्वीकारली आहे, याच गटाने ईशान्य सीरियात २०० ख्रिश्चनांचे अपहण केले आहे. ते लोक असीरियन ख्रिश्चनांपैकी असून, ख्रिश्चन समाजातील ती एक जुनी जमात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा