छतरपूर : काँग्रेस देशाचा विकास उलट करण्यात ‘निपुण’ असल्याचे सांगून, मतदारांनी या पक्षाला किमान शंभर वर्षे सत्तेपासून वंचित ठेवावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मतदारांना केले. १७ नोव्हेंबरला मतदान होणार असलेल्या भाजपशासित मध्य प्रदेशातील छतरपूर येथे ते निवडणूक प्रचारसभेत बोलत होते.‘एखादे वाहन रिव्हर्स गिअरमध्ये नेते, त्याचप्रमाणे काँग्रेस रिव्हर्स गिअरमध्ये प्रवीण आहे आणि तो सुशासनाचे रूपांतर कुशासनात करत आहे,’ असे मोदी म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> हमासशी लढताना नागरिकांचे संरक्षण करणे आवश्यक; फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांचे इस्रायलला आवाहन 

शंभर वर्षांपूर्वी बंदेलखंडला जलाशयांचा समृद्ध वारसा होता. मात्र मध्य प्रदेशात सत्तेवर असताना काँग्रेसने या भागातील पाण्याचा त्रास नाहीसा करण्यासाठी काहीही केले नाही आणि लोक दीर्घकाळ पाण्यापासून वंचित राहिले. अशाच प्रकारे मतदारांनी काँग्रेसला किमान १०० वर्षे सत्तेपासून वंचित ठेवावे, जेणेकरून तो चांगल्यासाठी सुधारणा करेल, असे पंतप्रधानांनी सांगितले.

‘गुलामगिरीची मानसिकता असलेल्या काँग्रेसला देशाचा विकास कळला नाही आणि देशाच्या वारशाशीही त्याचे काही देणेघेणे नव्हते,’ अशी टीका मोदी यांनी केली. छतरपूरमध्ये झालेल्या जी-२०च्या बैठकीचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, काँग्रेस सरकारसाठी संपूर्ण देश दिल्लीत सुरू झाला असता आणि तिथेच संपला असता. त्यांच्या कार्यकाळात योजनांची घोषणा दिल्लीत होत असे. विदेशी नेते दिल्लीतच येत असत आणि मोठे कार्यक्रम दिल्लीतच होत असत.