नवी दिल्ली : मंत्रिमंडळाचा विस्तार शनिवारी, १४ डिसेंबरला होणार असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दिल्लीत केला. त्याच वेळी, महायुतीतील मंत्रीपदाचे सूत्र निश्चित करण्यात आले असून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून आदेश आल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र तारखेबाबत त्यांनी मौन बाळगले.

विधानसभेचे हिवाळी अधिवेशन पुढील आठवड्यामध्ये सोमवारी, १६ डिसेंबर रोजी सुरू होणार असून त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल असे सांगितले जात होते. महायुतीतील मंत्रीपदाच्या सूत्रावर शिक्कामोर्तब करण्यासाठी देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी दिल्लीत दोन दिवस तळ ठोकला होता. दोन्ही नेते गुरुवारी मुंबईला रवाना झाले. भाजपचे १५-१६, शिंदे गट व अजित पवार गटाचे प्रत्येकी ८-९ मंत्री शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Devendra Fadnavis At Loksatta Varshavedh
Loksatta Varshavedh : ‘वर्षवेध’ मध्ये २०२४ चा परिपूर्ण माहितीकोश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Parliament Budget Session
Parliament Budget Session : “किती जणांचा मृत्यू झाला? नेमकं सत्य काय?”, कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेवरून मल्लिकार्जुन खरगे आक्रमक
Parliament Budget Session
Parliament Budget Session : “सरकार मृतांची माहिती का उघड करत नाही?”, कुंभमेळ्यातील घटनेचे राज्यसभेत पडसाद, विरोधकांचा सभात्याग
Maharashtra Kesari 2025
Maharashtra Kesari 2025 : पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी; सोलापूरचा महेंद्र गायकवाड पराभूत
Devendra Fadnavis On Sarpanch Santosh Deshmukh Case
Budget 2025: ‘भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड ठरणारा अर्थसंकल्प’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाचे केले कौतुक
Union Budget 2025 Stock Market Trend
Budget 2025: अर्थसंकल्प सादर करताच शेअर बाजारात पडझड; सेन्सेक्स, निफ्टीमध्ये घसरण
Union Budget 2025 nirmala sitharaman sensex
Union Budget 2025 Highlights : “देशावर ६० वर्षे राज्य करूनही, काँग्रेस ५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर कर सवलत…”, काँग्रेसच्या टीकेवर भाजपाचा पलटवार

हेही वाचा >>>Sunil Tatkare : “आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून…”; अमित शाह-शरद पवार भेटीनंतर सुनील तटकरेंची महत्त्वाची प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांची ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा

दोन्ही नेत्यांनी दिल्लीत बड्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या असल्या तरी मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात फडणवीस यांनी शहा, नड्डा व संघटना महासचिव बी. एल. संतोष यांच्याशी बुधवारी रात्री स्वतंत्रपणे चर्चा केली. या बैठकीमध्ये महायुतीतील मंत्रीपदे निश्चित करण्यात आल्याचे समजते. भाजपने गृह मंत्रालयासह इतर महत्त्वाची खाती मित्रपक्षांना देण्यास नकार दिला आहे. अर्थ व नागरी विकास या दोन्ही खात्यांवरदेखील भाजपने दावा केला असल्याचे सांगितले जाते. मात्र, याबाबत भाजपचे केंद्रीय नेते अंतिम निर्णय घेणार आहेत. गृहमंत्रीपद मिळणार नसल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजूनही नाराज असल्याचे बोलले जाते. फडणवीस व अजित पवार दोन्ही नेते भाजप नेत्यांच्या भेटीला आले असताना शिंदे यांनी दिल्लीवारी जाणीवपूर्वक टाळल्याचे मानले जाते.

महायुतीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात कोणतेही मतभेद वा तिढा नाही. भाजपचे मंत्री निश्चित करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व मी वरिष्ठांची भेट घेतली. प्रत्येक विभागातून कोणाला मंत्रीपद द्यायचे याची संभाव्य यादी तयार करण्यात आली.-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

पंतप्रधानांशी चर्चा

मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच बुधवारी दिल्ली दौऱ्यावर आले होते. फडणवीस यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोककल्याण मार्गावरील त्यांच्या सरकारी निवासस्थानी भेट घेतली. ‘महाराष्ट्र हे देशातील अत्यंत महत्त्वाचे राज्य असून विकासाला अधिक गती द्या, त्यासाठी आवश्यक सहकार्य केंद्राकडून दिले जाईल’, असे आश्वासन मोदींनी दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले. ‘२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात करण्याआधी मोदींनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना नमन केले होते. मोदींची छत्रपतींवर श्रद्धा आहे. शिवाजी महाराजांच्या मार्गाचाच मोदी नेहमी अवलंब करतात. म्हणून मी मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट दिली’, असेही फडणवीस म्हणाले.

हेही वाचा >>>Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला

फडणवीस यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते विकास व वाहतूकमंत्री नितीन गडकरी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेट घेतली.

अजित पवार यांनीही पत्नी सुनेत्रा यांच्यासह गुरुवारी संसदेमध्ये उपराष्ट्रपती धनखड व केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्याआधी अजित पवार यांनी प्रफुल पटेल व सुनील तटकरे यांच्याशी पटेल यांच्या निवासस्थानी मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा केल्याचे समजते.

Story img Loader