पीटीआय, रायपूर
आपण कधीही आळीपाळीने मुख्यमंत्रीपद मिळण्यासंबंधी कराराची चर्चा केलेली नाही असे छत्तीसगडचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री टी एस सिंह देव यांनी गुरुवारी सांगितले. याबाबत केवळ प्रसारमाध्यमेच चर्चा करत होते अशी टीका त्यांनी केली.सिंह देव यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंजुरी दिली. सिंह देव गुरुवारी सकाळी रायपूरला पोहोचले, त्या वेळी त्यांनी पक्षाचे आभार मानले आणि त्याच वेळी ‘देर आये, दुरुस्त आये’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते सकाळी रायपूर विमानतळावर आल्यानंतर तिथे जमलेल्या त्यांच्या समर्थकांनी जल्लोषात स्वागत केले आणि ‘टीएस बाबा जिंदाबाद’ अशा घोषणाही दिल्या.
गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री भूपेश बाघेल आणि सिंह देव यांच्यादरम्यान रस्सीखेच सुरू होती. या वर्षांच्या अखेरीस राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. त्यापूर्वी काँग्रेसचा पक्षांतर्गत तणाव कमी करण्याचा प्रयत्न आहे.