बलात्कार प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडून दोषी ठरवण्यात आलेले डेरा सच्चा सौदाचे प्रमुख राम रहिम यांचे आर्थिक साम्राज्य डोळे विस्फारुन टाकणारे आहे. डेरा सच्चा सौदाच्या माध्यमातून गुरुमित राम रहिम यांनी देशभरात अनेक ठिकाणी आश्रम उभारले आहेत. राम रहिम यांच्या मालमत्तेचे मूल्य अब्जावधींच्या घरात जाते. विशेष म्हणजे या सर्व उत्पन्नावर बाबा राम रहिम यांना कर भरावा लागत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१९४८ मध्ये डेरा सच्चा सौदाची स्थापना झाली होती. याचे प्रमुखपद सध्या राम रहिम यांच्याकडे आहे. राम रहिम यांचा जन्म १५ ऑगस्ट १९६७ रोजी राजस्थानमधील गंगानगर येथील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या अनुयायांची संख्या लाखोंच्या घरात आहे. पंजाब आणि हरयाणामध्ये राम रहिम यांच्या समर्थकांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच राम रहिम यांचे आर्थिक साम्राज्य प्रचंड मोठे आहे. तीन वर्षांपूर्वीच डेराचे दर दिवसाचे सरासरी उत्पन्न १६ लाख ४४ हजार ८३३ रुपये होते. यावरुनच त्यांच्या वार्षिक उत्पन्नाची कल्पना येईल.

२०१०-११ मध्ये डेराचे वार्षिक उत्पन्न तब्बल १६ कोटी ५२ लाख ४८ हजार ४५५ रुपये इतके होते. २०११-१२ या आर्थिक वर्षात डेराचे उत्पन्न २० कोटी २० लाख ९९ हजार ९९९ हजार रुपयांवर जाऊन पोहोचले. यानंतरच्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०१२-१३ मध्ये डेराच्या उत्पन्नाचा आकडा २९ कोटी ८ लाख १८ हजार ७६० रुपयांवर जाऊन पोहोचला. डेराला या कोट्यवधींच्या उत्पन्नावर कोणताही कर द्यावा लागत नाही. कारण आयकर कायदा १९६१ च्या कलम १० (२३) अंतर्गत डेराला कर सवलत देण्यात आली आहे.

डेरा सच्चा सौदाकडून सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये पुनर्वसन केंद्र आणि रक्तदान शिबिरांचा समावेश आहे. बाबा राम रहिम यांची जीवनशैली अतिशय श्रीमंती आहे. राम रहिम यांच्याकडे रेंज रोव्हर या महागड्या गाड्यांचा ताफा आहे. प्रवास करताना त्यांच्याकडून तब्बल १०० गाड्यांचा वापर होतो. देशातील केवळ ३६ व्यक्तींना व्हीव्हीआयपी दर्जा देण्यात आला आहे. या व्यक्तींना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. यामध्ये राम रहिम यांचा समावेश होता. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांची झेड प्लस सुरक्षा काढण्यात आली.

राम रहिम यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. या चित्रपटात ‘सबकुछ राम रहिम’ अशीच स्थिती होती. एमएसजी: द मेसेंजर ऑफ गॉड, एमएसजी २ द मेसेंजर, एमएसजी द वॉरियर लायन हार्ट अशा चित्रपटांमध्ये राम रहिम मुख्य भूमिकेत दिसले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन, निर्मिती, नृत्य दिग्दर्शन सर्व काही राम रहिम यांनीच केले होते. राम रहिम यांच्या अनुयायांची संख्या लाखोंच्या घरात असल्याने या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळाले. पंजाब आणि हरयाणामधील दलित समाज राम रहिम यांचा भक्त असल्याने मोठमोठे राजकीय नेतेदेखील त्यांच्या दर्शनाला येतात. डेरा सच्चा सौदाने समर्थन दिल्यामुळे पंजाब आणि हरयाणामध्ये काँग्रेस, भाजप, लोक दलाने निवडणुका जिंकल्या आहेत.